स्तोत्र
दावीदचं गीत. मिक्ताम.* संचालकासाठी सूचना. “नाश करू नकोस” याच्या चालीवर गायलं जावं. शौलने दावीदच्या घरावर पाळत ठेवण्यासाठी आणि त्याला मारून टाकण्यासाठी माणसं पाठवली,+ तेव्हा दावीदने हे गीत रचलं.
५९ हे माझ्या देवा, माझ्या शत्रूंपासून माझी सुटका कर.+
माझ्याविरुद्ध उठणाऱ्यांपासून माझं संरक्षण कर.+
२ दुष्टपणे वागणाऱ्यांपासून माझी सुटका कर,
आणि क्रूर* माणसांपासून मला वाचव.
३ बघ! ते माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसतात;+
बलवान माणसं माझ्यावर हल्ला करतात.
हे यहोवा, मी कोणताही अपराध किंवा गुन्हा केलेला नसताना ते असं वागतात.+
४ माझा काहीही दोष नसताना, ते माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीने धावून येतात.
माझी हाक ऐकून तू ऊठ आणि त्यांच्याकडे पाहा.
५ कारण हे यहोवा, सैन्यांच्या देवा, तू इस्राएलचा देव आहेस.+
जागा हो आणि सर्व राष्ट्रांकडे आपलं लक्ष वळव.
दुष्टपणे दगा देणाऱ्यांना दया दाखवू नकोस.+ (सेला )
७ त्यांच्या तोंडून शिव्याशाप निघतात.
त्यांचे ओठ तलवारींसारखे आहेत.+
कारण ते म्हणतात: “कोण ऐकणार आहे?”+
८ पण हे यहोवा, तू त्यांच्यावर हसशील.+
तू सर्व राष्ट्रांवर तुच्छतेने हसशील.+
१० माझ्याबद्दल एकनिष्ठ प्रेम दाखवणारा देव माझ्या मदतीला धावून येईल;+
देव माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मला दाखवेल.+
११ त्यांना ठार मारू नकोस, नाहीतर माझे लोक हे विसरतील.
तुझ्या सामर्थ्याने त्यांना इकडे तिकडे भटकायला लाव;
हे यहोवा, तू आमची ढाल आहेस,+ त्यांना खाली पाड.
१२ ते आपल्या तोंडाने, आपल्या ओठांनी पाप करतात.
त्यांना त्यांच्याच गर्वामुळे अडचणीत सापडू दे.+
कारण ते लोकांना शाप देतात आणि त्यांची फसवणूक करतात.
१३ तुझ्या क्रोधात त्यांचा नाश कर;+
त्यांचा अंत कर; ते नाहीसे होवोत.
याकोबवर आणि पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत देव राज्य करतो+ हे त्यांना कळू दे. (सेला )
१५ त्यांना अन्नाच्या शोधात वणवण फिरायला लाव;+
त्यांना पोटभर खायला न मिळो, डोकं टेकायला जागा न मिळो.
१६ पण मी तर तुझ्या सामर्थ्याचं गुणगान करीन;+
मी पहाटेच तुझ्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल आनंदाने सांगीन.
कारण, तू माझा सुरक्षित आश्रय आहेस.+
तू माझ्यासाठी संकटाच्या काळात पळून जायचं ठिकाण आहेस.+