स्तोत्र
दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. तंतुवाद्यांसोबत गायलं जावं.
६१ हे देवा, माझी मदतीची याचना ऐक!
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे!+
मला उंच खडकावर ने.+
३ कारण तू माझा आश्रय आहेस,
तू मला शत्रूंपासून सुरक्षित ठेवणारा मजबूत बुरूज आहेस.+
५ कारण हे देवा, मी केलेले नवस तू ऐकले आहेस.
तुझ्या नावाचं भय मानणाऱ्यांसाठी असलेला वारसा तू मला दिला आहेस.+
६ तू राजाच्या आयुष्याचे दिवस वाढवशील.+
तो पुष्कळ पिढ्या पाहील.
७ तो देवासमोर सर्वकाळ राजासनावर बसेल.*+
त्याला एकनिष्ठ प्रेम आणि विश्वासूपणा दाखव, म्हणजे ते त्याचं रक्षण करतील.+