स्तोत्र
दावीदचं गीत. मिक्ताम.* संचालकासाठी सूचना. “नाश करू नकोस” याच्या चालीवर गायलं जावं.
५८ माणसांनो, तुम्ही शांत राहिलात, तर नीतीबद्दल बोलू शकाल का?+
तुम्ही गप्प बसलात तर योग्य न्याय करू शकाल का?+
५ मांत्रिकांनी कितीही कुशलपणे मंत्र म्हटले,
तरीही तो त्यांचं ऐकत नाही.
६ हे देवा, त्या दुष्टांचे दात पाडून टाक!
हे यहोवा, या सिंहांचे* जबडे फोडून टाक!
७ ते वाहून जाणाऱ्या पाण्यासारखे नाहीसे होवोत.
देव आपलं धनुष्य ताणून त्यांना बाणांनी खाली पाडो.
८ चालता चालता विरघळून जाणाऱ्या गोगलगाईसारखे ते होवोत.
जे मूल मेलेलं जन्माला येतं, जे कधीच सूर्याचा प्रकाश पाहत नाही, अशा मुलासारखे ते होवोत.
९ तुमच्या पातेल्यांना काट्यांच्या जळणाची उष्णता लागण्याआधीच,
देव त्या ओल्या आणि सुक्या फांद्या, वादळी वाऱ्याने उडवाव्यात तशा उडवून नेईल.+
१० देवाने सूड घेतला आहे, हे पाहून नीतिमान माणसाला आनंद होईल;+
त्याचे पाय दुष्टांच्या रक्तात भिजतील.+
११ तेव्हा लोक म्हणतील: “नीतिमानाला चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही.+
खरोखरच पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे.”+