वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ४४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • साहाय्यासाठी प्रार्थना

        • “तूच आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवलंस” (७)

        • कत्तल केल्या जाणाऱ्‍या मेंढरांसारखी स्थिती (२२)

        • “आम्हाला साहाय्य करण्यासाठी ऊठ!” (२६)

स्तोत्र ४४:उपरीलेखन

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२इत २०:१९

स्तोत्र ४४:१

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:१४; गण २१:१४; शास ६:१३

स्तोत्र ४४:२

समासातील संदर्भ

  • +अनु ७:१
  • +यहो १०:५, ११; स्तो १३५:१०, ११
  • +निर्ग १५:१७; स्तो ७८:५५; ८०:८, ९

स्तोत्र ४४:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुझ्या चेहऱ्‍याच्या प्रकाशाने.”

समासातील संदर्भ

  • +अनु ४:३८; यहो २४:१२
  • +१शमु १२:२२
  • +यश ६३:११-१३
  • +अनु ७:७, ८

स्तोत्र ४४:४

तळटीपा

  • *

    किंवा “महान तारण.”

  • *

    किंवा “मिळावा असा आदेश दे.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७४:१२; यश ३३:२२

स्तोत्र ४४:५

समासातील संदर्भ

  • +स्तो १८:३९; फिलि ४:१३
  • +स्तो ६०:१२

स्तोत्र ४४:६

समासातील संदर्भ

  • +१शमु १७:४५; स्तो २०:७; ३३:१६

स्तोत्र ४४:७

समासातील संदर्भ

  • +यहो २४:८

स्तोत्र ४४:१०

समासातील संदर्भ

  • +अनु २८:१५, २५

स्तोत्र ४४:११

समासातील संदर्भ

  • +अनु २८:६४

स्तोत्र ४४:१२

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांच्या मोबदल्यात मिळणाऱ्‍या किमतीने.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:३०

स्तोत्र ४४:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “म्हण.”

समासातील संदर्भ

  • +अनु २८:३७; २इत ७:२०

स्तोत्र ४४:१७

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:१०

स्तोत्र ४४:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ६

स्तोत्र ४४:२१

समासातील संदर्भ

  • +स्तो १३९:१; उप १२:१४; यिर्म १७:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३६

स्तोत्र ४४:२२

समासातील संदर्भ

  • +रोम ८:३६

स्तोत्र ४४:२३

समासातील संदर्भ

  • +स्तो ७:६; ७८:६५, ६६
  • +ईयो १३:२४; स्तो १३:१; ८८:१४

स्तोत्र ४४:२४

तळटीपा

  • *

    शब्दशः “चेहरा का लपवतोस?”

स्तोत्र ४४:२५

समासातील संदर्भ

  • +स्तो ११९:२५

स्तोत्र ४४:२६

तळटीपा

  • *

    शब्दशः “सोडव.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३३:२०
  • +स्तो १३०:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ४४:उपरीलेखन२इत २०:१९
स्तो. ४४:१निर्ग १३:१४; गण २१:१४; शास ६:१३
स्तो. ४४:२अनु ७:१
स्तो. ४४:२यहो १०:५, ११; स्तो १३५:१०, ११
स्तो. ४४:२निर्ग १५:१७; स्तो ७८:५५; ८०:८, ९
स्तो. ४४:३अनु ४:३८; यहो २४:१२
स्तो. ४४:३१शमु १२:२२
स्तो. ४४:३यश ६३:११-१३
स्तो. ४४:३अनु ७:७, ८
स्तो. ४४:४स्तो ७४:१२; यश ३३:२२
स्तो. ४४:५स्तो १८:३९; फिलि ४:१३
स्तो. ४४:५स्तो ६०:१२
स्तो. ४४:६१शमु १७:४५; स्तो २०:७; ३३:१६
स्तो. ४४:७यहो २४:८
स्तो. ४४:१०अनु २८:१५, २५
स्तो. ४४:११अनु २८:६४
स्तो. ४४:१२अनु ३२:३०
स्तो. ४४:१४अनु २८:३७; २इत ७:२०
स्तो. ४४:१७निर्ग ३४:१०
स्तो. ४४:२१स्तो १३९:१; उप १२:१४; यिर्म १७:१०
स्तो. ४४:२२रोम ८:३६
स्तो. ४४:२३स्तो ७:६; ७८:६५, ६६
स्तो. ४४:२३ईयो १३:२४; स्तो १३:१; ८८:१४
स्तो. ४४:२५स्तो ११९:२५
स्तो. ४४:२६स्तो ३३:२०
स्तो. ४४:२६स्तो १३०:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ४४:१-२६

स्तोत्र

कोरहच्या मुलांचं+ गीत. मस्कील.* संचालकासाठी.

४४ हे देवा, तू पूर्वीच्या दिवसांत,

आमच्या वाडवडिलांच्या काळात केलेल्या कार्यांबद्दल

आम्ही आपल्या कानांनी ऐकलंय,

आमच्या वाडवडिलांनी आम्हाला त्यांबद्दल सांगितलंय.+

 २ तू आपल्या सामर्थ्याने राष्ट्रांना हाकलून लावलंस;+

तू त्यांना चिरडून बाहेर घालवलंस+

आणि आमच्या वाडवडिलांना तो देश दिलास.+

 ३ त्यांनी आपल्या तलवारीने त्या देशाचा ताबा घेतला नाही;+

त्यांच्या स्वतःच्या बळावर त्यांनी विजय मिळवला नाही.+

तर तुझ्या उजव्या हाताने, तुझ्या सामर्थ्याने+ आणि कृपेनेच* त्यांना विजय मिळाला,

कारण तुझं त्यांच्यावर प्रेम होतं.+

 ४ हे देवा, तू माझा राजा आहेस.+

याकोबला मोठा विजय* मिळवून दे.*

 ५ तुझ्या ताकदीने आम्ही आपल्या वैऱ्‍यांना हाकलून लावू;+

तुझ्या नावाने आम्ही आपल्याविरुद्ध उठणाऱ्‍यांना पायाखाली तुडवू.+

 ६ कारण माझा भरवसा माझ्या धनुष्यावर नाही,

माझी तलवार मला वाचवू शकत नाही.+

 ७ तूच आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवलंस,+

आमचा द्वेष करणाऱ्‍यांना तूच लज्जित केलंस.

 ८ आम्ही दिवसभर देवाची स्तुती करू,

तुझ्या नावाची आम्ही सर्वकाळ उपकारस्तुती करू. (सेला )

 ९ पण आता तू आम्हाला सोडून दिलं आहेस आणि आम्हाला लज्जित केलं आहेस,

आता तू आमच्या सैन्यांसोबत लढाईला जात नाहीस.

१० तू आम्हाला आमच्या शत्रूंपासून माघार घ्यायला लावतोस;+

आमचा द्वेष करणारे त्यांना हवं ते लुटून नेतात.

११ मेंढरांसारखं खाऊन टाकण्यासाठी तू आम्हाला त्यांच्या हाती देतोस;

तू राष्ट्रांमध्ये आमची पांगापांग केली आहेस.+

१२ तू आपल्या लोकांना अगदीच कमी भावात विकून टाकतोस;+

त्यांना विकून* तू आपला फायदा करून घेत नाहीस.

१३ आमच्या शेजाऱ्‍यांमध्ये तू आमची लाजिरवाणी स्थिती केली आहेस,

आमच्या आजूबाजूचे लोक आम्हाला हसतात आणि आमची थट्टा करतात.

१४ राष्ट्रांमध्ये तू आम्हाला हसण्याचा विषय* बनवलं आहेस,+

लोक आम्हाला पाहून तिरस्काराने डोकं हलवतात.

१५ दिवसभर मला अपमानित वाटतं,

मला तोंड दाखवायला जागा उरली नाही.

१६ कारण आमचे शत्रू टोमणे मारतात आणि आमचा अपमान करतात,

ते आमचा सूड घेतात.

१७ ही सगळी संकटं येऊनही, आम्ही तुला विसरलो नाही,

तुझा करार आम्ही मोडला नाही.+

१८ आमचं हृदय भरकटलं नाही;

आमच्या पावलांनी तुझा मार्ग सोडला नाही.

१९ पण तू आम्हाला, कोल्हे राहतात त्या ठिकाणी चिरडलंस;

तू काळ्याकुट्ट अंधाराने आम्हाला झाकून टाकलंस.

२० जर आम्ही आपल्या देवाचं नाव विसरलो असू,

किंवा प्रार्थना करण्यासाठी परक्या देवापुढे हात पसरत असू,

२१ तर देवाला हे समजणार नाही का?

त्याला हृदयातल्या गुप्त गोष्टी माहीत असतात.+

२२ तुझ्यामुळे दिवसभर आम्हाला मृत्यूचा सामना करावा लागतो;

कत्तल केल्या जाणाऱ्‍या मेंढरांसारखी आमची स्थिती झाली आहे.+

२३ हे यहोवा, ऊठ! तू का झोपून राहतोस?+

जागा हो! आम्हाला कायमचं सोडून देऊ नकोस.+

२४ तू आपलं तोंड का फिरवतोस?*

आमचं दुःख आणि आमच्यावर होणारे जुलूम का विसरतोस?

२५ कारण आम्ही जमिनीवर पडलो आहोत;

आम्ही धुळीला मिळालो आहोत.+

२६ आम्हाला साहाय्य करण्यासाठी ऊठ!+

तुझ्या एकनिष्ठ प्रेमापोटी आमची सुटका कर.*+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा