स्तोत्र
दुसरं पुस्तक
(स्तोत्रं ४२-७२)
कोरहच्या मुलांचं+ मस्कील.* संचालकासाठी.
२ माझा जीव* देवासाठी, जिवंत देवासाठी तहानलेला आहे.+
मी कधी एकदा जाऊन देवापुढे उभा राहीन, असं मला झालंय!+
३ रात्रंदिवस अश्रूच माझं अन्न झाले आहेत.
दिवसभर लोक मला असा टोमणा मारतात: “कुठे आहे तुझा देव?”+
४ पूर्वी, मी कसा सर्वांसोबत चालत,
अदबीने* त्यांच्या पुढे-पुढे चालत, देवाच्या घराकडे जायचो;
आम्ही सगळे कसे आनंदाने उपकारस्तुती करत,
सणाच्या वेळी उत्सव साजरा करणाऱ्या घोळक्यासारखे जायचो;+
हे सगळं आठवलं, की माझं मन खूप खिन्न होतं.
माझं मन का असं बेचैन झालंय?
मी तर देवाची वाट पाहीन.+
माझं तारण करणाऱ्या महान देवाचं मी गुणगान करत राहीन.+
६ माझ्या देवा, मी* निराश झालोय.+
म्हणून मी तुझी आठवण करतोय.+
यार्देन नदीच्या देशात आणि हर्मोन पर्वताच्या शिखरांवर,
मिस्हार पर्वतावर,* मी तुझी आठवण करतोय.
७ धबधब्यांच्या जोरदार आवाजाने,
लाटा एकमेकांना हाका मारतात.
तुझ्या या उसळत्या लाटा, माझ्यावर कोसळलेल्या संकटांसारख्या आहेत.+
८ दिवसा, यहोवा आपलं एकनिष्ठ प्रेम माझ्यावर प्रकट करेल.
रात्री त्याचं गीत, माझ्या जीवनदात्या देवाला केलेली प्रार्थना, माझ्यासोबत असेल.+
९ माझा खडक असलेल्या माझ्या देवाला मी म्हणीन:
“तू मला का विसरलास?+
माझ्या शत्रूच्या जुलमांमुळे मी असा शोक करत का फिरावं?”+
११ मी* का असा निराश झालोय?
माझं मन का असं बेचैन झालंय?
मी तर देवाची वाट पाहीन.+
माझं तारण करणाऱ्या महान देवाचं मी गुणगान करत राहीन.+