ईयोब
३३ पण ईयोब, आता माझे शब्द लक्ष देऊन ऐक;
मी जे काही सांगतो ते ऐक.
२ मला माझं तोंड उघडावंच लागेल;
माझ्या जिभेला* बोलावंच लागेल.
३ माझ्या शब्दांतून माझा प्रामाणिकपणा दिसून येईल,+
मला जे कळतं ते मी मनापासून सांगीन.
५ तुला उत्तर देता येत असेल तर दे;
तुझे वाद माझ्यापुढे मांडायला तयार हो.
६ बघ! देवापुढे मीही तुझ्यासारखाच आहे;
मलाही मातीपासूनच घडवण्यात आलंय.+
७ म्हणून मला घाबरू नकोस,
माझ्या शब्दांमुळे तुला दडपण येणार नाही.
८ पण मी तुला असं बोलताना ऐकलं,
आणि तू सारखंसारखं असं म्हणत होतास,
९ ‘मी शुद्ध आहे, मी अपराध केला नाही;+
मी निर्दोष आहे, मी काहीच चुकीचं केलेलं नाही.+
१० पण देव माझा विरोध करायला निमित्तं शोधतो;
तो मला आपला शत्रू समजतो.+
१२ पण तू चुकीचं बोलत आहेस, म्हणून मी तुला सांगतो:
देव नाशवंत माणसापेक्षा फार महान आहे.+
१३ तू त्याच्याविरुद्ध का तक्रार करतोस?+
त्याने तुला काही उत्तर दिलं नाही म्हणून?+
१४ देव एकदा बोलतो, मग दुसऱ्यांदा बोलतो,
पण माणूस लक्ष देत नाही.
१५ लोक जेव्हा गाढ झोपेत असतात,
जेव्हा ते आपल्या बिछान्यावर झोपलेले असतात,
तेव्हा स्वप्नात, रात्रीच्या दृष्टान्तात,+
१६ तो त्यांचे कान उघडतो+
आणि त्यांच्या मनात आपलं शिक्षण रुजवतो.*
१९ एखादा अंथरुणात वेदनेने तळमळतो;
हाडांच्या सतत दुखण्याने तो कण्हतो, तेव्हा तो धडा शिकतो,
२० त्याच्या जिवाला अन्न नकोसं वाटतं;
२१ त्याचं शरीर अशक्त होत जातं,
पूर्वी न दिसणारी त्याची सगळी हाडं दिसू लागतात.*
२२ तो* कबरेच्या जवळ जाऊ लागतो;
नाश करणारे त्याच्या जीवनाचा ताबा घेतात.
२३ जर त्याच्याकडे कोणी दूत* आला;
त्याच्यासाठी मध्यस्थी करणारा हजारातला एक, असा कोणी आला,
आणि त्याने त्याला योग्य मार्ग दाखवला,
२४ तर देव त्याच्यावर कृपा करेल आणि म्हणेल,
‘याला कबरेत जाऊ देऊ नका!+
मला खंडणी मिळाली आहे!+
२५ त्याचं शरीर तरुणपणात होतं त्यापेक्षा ताजंतवानं* व्हावं;+
त्याच्या तारुण्यातला उत्साह त्याला परत मिळावा.’+
२६ तो देवाकडे विनंती करेल,+ आणि ती स्वीकारली जाईल,
देवाचा चेहरा पाहून तो आनंदाने ओरडेल,
देव त्याला पुन्हा नीतिमान ठरवेल.
२७ मग तो इतरांना सांगेल,*
‘माझ्या हातून पाप घडलं;+ मी चुकीच्या मार्गाने गेलो,
पण ज्या शिक्षेच्या मी लायक होतो, ती मला मिळाली नाही.*
२९ देव माणसासाठी या गोष्टी
दोनदा, तर कधी तीनदा करतो.
३० त्याला त्या माणसाला,* कबरेत जाण्यापासून वाचवायचं असतं;
त्याला जीवनाचा प्रकाश मिळावा अशी देवाची इच्छा असते.+
३१ म्हणून ईयोब, माझं ऐक! माझ्या बोलण्याकडे लक्ष दे!
शांत राहा, म्हणजे मी पुढे बोलीन.
३२ तुला काही बोलायचं असेल, तर जरूर बोल.
मला उत्तर दे, कारण तुला निर्दोष ठरवण्याचीच माझी इच्छा आहे.
३३ पण तुझ्याजवळ बोलायला काहीच नसेल, तर माझं ऐक.
शांत राहून ऐक, म्हणजे मी तुला बुद्धीच्या गोष्टी सांगीन.”