ईयोब
३४ मग अलीहू पुढे म्हणाला:
२ “बुद्धिमान माणसांनो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या;
पुष्कळ ज्ञान असलेल्यांनो, माझं ऐका.
३ जशी जिभेला* चव कळते,
तसेच कान शब्दांची पारख करतात.
४ योग्य काय आहे, हे आपण तपासून पाहू;
चांगलं काय आहे, ते आपसात ठरवू.
६ माझा न्याय कसा व्हावा, याबद्दल मी खोटं बोलीन का?
काहीच चूक केलेली नसताना, माझा घाव बरा होत नाही.’+
७ अपमानाचे घोट पाण्याप्रमाणे पिणारा,
ईयोबसारखा दुसरा कोणी आहे का?
८ तो वाईट कामं करणाऱ्यांच्या सोबत राहतो
आणि दुष्टांशी मैत्री करतो.+
९ तो म्हणतो, ‘देवाच्या इच्छेप्रमाणे वागल्याने
माणसाला काहीच फायदा होत नाही.’+
१० म्हणून समजशक्ती* असलेल्यांनो माझं ऐका:
११ कारण माणसाच्या कार्यांप्रमाणे देव त्याला प्रतिफळ देईल;+
आणि त्याच्या वागणुकीचे परिणाम त्याला भोगायला लावेल.
१३ त्याला सर्व पृथ्वीचा अधिकार कोणी दिला?
आणि सबंध जगावर त्याला कोणी नेमलं?
१४ जर त्याने मानवांवर आपली नजर* रोखली,
आणि त्यांची जीवन-शक्ती व श्वास आपल्याकडे परत घेतला,+
१५ तर सर्व मानवांचा एकाच वेळी नाश होईल
आणि संपूर्ण मानवजात मातीला मिळेल.+
१६ म्हणून, तुमच्याजवळ समजशक्ती असेल, तर लक्ष द्या;
मी काय म्हणतोय, ते नीट ऐका.
१७ जो न्यायाचा द्वेष करतो, त्याच्याकडे अधिकार असू शकतो का?
तुम्ही नीतिमान असलेल्या एका शक्तिशाली अधिकाऱ्याला दोषी ठरवाल का?
१८ ‘तू काहीच कामाचा नाहीस,’ असं तुम्ही एका राजाला म्हणाल का?
किंवा ‘तुम्ही दुष्ट आहात,’ असं अधिकाऱ्यांना म्हणाल का?+
१९ देव अधिकाऱ्यांचा पक्ष घेत नाही
आणि गरिबांपेक्षा श्रीमंतांवर* जास्त कृपा करत नाही,+
कारण त्या सर्वांनाच त्याने आपल्या हातांनी घडवलंय.+
२० मध्यरात्री अचानक त्यांचा मृत्यू होतो;+
त्यांचा थरकाप उडतो आणि ते नाहीसे होतात;
ताकदवान लोकही, मानवाचा हात न लागता नष्ट होतात.+
२१ कारण मानवाच्या मार्गांवर देवाची नजर असते,+
त्याच्या प्रत्येक पावलाकडे त्याचं लक्ष असतं.
२३ कारण कोणत्याही मानवासाठी, आपल्या न्यायासनासमोर येण्याची
निश्चित वेळ देवाने ठरवलेली नाही.
२४ तो ताकदवान लोकांना त्यांच्या पदावरून खाली पाडून
त्यांच्या जागी इतरांना नेमतो;+ त्याला तपास करावा लागत नाही.
२५ कारण ते काय करत आहेत, हे त्याला चांगलं माहीत असतं;+
तो एका रात्रीत त्यांना उलथून टाकतो आणि त्यांचा चुराडा होतो.+
२६ त्यांच्या दुष्टपणामुळे,
तो सर्वांच्या देखत त्यांचा नाश करतो.+
२७ कारण त्यांनी त्याच्या मार्गांवर चालायचं सोडून दिलंय;+
त्याच्या आज्ञांबद्दल त्यांना जराही आदर वाटत नाही.+
२८ ते गोरगरिबांना त्याच्याकडे तक्रार करायला भाग पाडतात,
म्हणून तो त्या असाहाय्य माणसांचा आक्रोश ऐकतो.+
२९ देव गप्प राहिला, तर त्याला कोण दोषी ठरवू शकतं?
तो आपलं तोंड झाकून घेतो, तेव्हा कोण त्याला पाहू शकतं?
राष्ट्र असो किंवा एखादा माणूस, परिणाम एकसारखाच असतो.
३० जो लोकांना पाशात अडकवू शकतो,
अशा दुष्टाला तो सत्ता चालवू देत नाही.+
३१ कोणीही देवाला असं म्हणू शकतं का:
‘मी कोणतीही चूक केलेली नसताना, मला शिक्षा देण्यात आली.+
३२ माझ्या नजरेतून काही सुटलं असेल, तर ते माझ्या लक्षात आणून दे;
मी जर काही चुकीचं केलं असेल, तर ते मी पुन्हा करणार नाही.’
३३ तुला त्याचा निर्णय मान्य नाही, म्हणून त्याने तुझ्या इच्छेप्रमाणे तुझी भरपाई करावी का?
हे मी नाही, तर तूच ठरव.
तुला माहीत आहे, तर तूच मला सांग.
३४ समजशक्ती* असलेले लोक;
माझं बोलणं ऐकणारे बुद्धिमान लोक मला म्हणतील,
३५ ‘ईयोबला काही माहीत* नसूनही तो बोलतो,+
त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही.’*
३६ ईयोबची अगदी पूर्णपणे परीक्षा झाली पाहिजे,*
कारण तो दुष्ट माणसांसारखी उत्तरं देतो.