वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास २६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ इतिहास रूपरेषा

      • यहूदाचा राजा उज्जीया (१-५)

      • उज्जीयाने लढलेली युद्धं (६-१५)

      • गर्विष्ठपणामुळे उज्जीया कुष्ठरोगी बनतो (१६-२१)

      • उज्जीयाचा मृत्यू (२२, २३)

२ इतिहास २६:१

समासातील संदर्भ

  • +मत्त १:८
  • +२रा १४:२१

२ इतिहास २६:२

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजल्यानंतर.”

समासातील संदर्भ

  • +१रा ९:२६; २रा १६:६
  • +२रा १४:२२

२ इतिहास २६:३

समासातील संदर्भ

  • +यश १:१; ६:१
  • +२रा १५:२

२ इतिहास २६:४

समासातील संदर्भ

  • +२रा १४:१, ३

२ इतिहास २६:५

समासातील संदर्भ

  • +२इत १४:७; स्तो १:२, ३

२ इतिहास २६:६

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१; २इत २१:१६; यश १४:२९
  • +१इत १८:१
  • +यहो १५:११, १२
  • +यहो १५:२०, ४६; १शमु ५:१

२ इतिहास २६:७

समासातील संदर्भ

  • +२इत १७:११

२ इतिहास २६:८

तळटीपा

  • *

    किंवा “कर.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १९:३६, ३८; शास ११:१५

२ इतिहास २६:९

तळटीपा

  • *

    भिंतीच्या बाजूला बांधलेला टेकावा.

  • *

    अतिशय उंच इमारत.

समासातील संदर्भ

  • +नहे ३:१३
  • +२रा १४:१३; यिर्म ३१:३८; जख १४:१०
  • +२इत १४:२, ७

२ इतिहास २६:१०

तळटीपा

  • *

    किंवा “कापून काढल्या,” कदाचित खडकातून.

  • *

    किंवा “पठारी.”

समासातील संदर्भ

  • +२रा ९:१७

२ इतिहास २६:११

समासातील संदर्भ

  • +२इत २४:११
  • +गण १:२, ३; २शमु २४:९

२ इतिहास २६:१३

समासातील संदर्भ

  • +२इत ११:१; १३:३; १४:८; १७:१४; २५:५

२ इतिहास २६:१४

समासातील संदर्भ

  • +१शमु १७:४, ५
  • +२इत ११:५, १२
  • +शास २०:१६; १शमु १७:४९; १इत १२:१, २

२ इतिहास २६:१५

समासातील संदर्भ

  • +२इत १४:२, ७

२ इतिहास २६:१६

समासातील संदर्भ

  • +गण १:५१

२ इतिहास २६:१८

समासातील संदर्भ

  • +गण १६:३९, ४०; १८:७
  • +निर्ग ३०:७; १इत २३:१३

२ इतिहास २६:१९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२इत १६:१०; २५:१५, १६
  • +गण १२:१०; २रा ५:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५२४

२ इतिहास २६:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५३५

२ इतिहास २६:२१

समासातील संदर्भ

  • +लेवी १३:४५, ४६; गण ५:२; १२:१४, १५
  • +२रा १५:५-७

२ इतिहास २६:२२

समासातील संदर्भ

  • +यश १:१; ६:१

२ इतिहास २६:२३

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

  • *

    ही जमीन शाही कबरींच्या शेजारी असावी असं दिसतं.

समासातील संदर्भ

  • +२रा १५:३२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ इति. २६:१मत्त १:८
२ इति. २६:१२रा १४:२१
२ इति. २६:२१रा ९:२६; २रा १६:६
२ इति. २६:२२रा १४:२२
२ इति. २६:३यश १:१; ६:१
२ इति. २६:३२रा १५:२
२ इति. २६:४२रा १४:१, ३
२ इति. २६:५२इत १४:७; स्तो १:२, ३
२ इति. २६:६२शमु ८:१; २इत २१:१६; यश १४:२९
२ इति. २६:६१इत १८:१
२ इति. २६:६यहो १५:११, १२
२ इति. २६:६यहो १५:२०, ४६; १शमु ५:१
२ इति. २६:७२इत १७:११
२ इति. २६:८उत्प १९:३६, ३८; शास ११:१५
२ इति. २६:९नहे ३:१३
२ इति. २६:९२रा १४:१३; यिर्म ३१:३८; जख १४:१०
२ इति. २६:९२इत १४:२, ७
२ इति. २६:१०२रा ९:१७
२ इति. २६:११२इत २४:११
२ इति. २६:११गण १:२, ३; २शमु २४:९
२ इति. २६:१३२इत ११:१; १३:३; १४:८; १७:१४; २५:५
२ इति. २६:१४१शमु १७:४, ५
२ इति. २६:१४२इत ११:५, १२
२ इति. २६:१४शास २०:१६; १शमु १७:४९; १इत १२:१, २
२ इति. २६:१५२इत १४:२, ७
२ इति. २६:१६गण १:५१
२ इति. २६:१८गण १६:३९, ४०; १८:७
२ इति. २६:१८निर्ग ३०:७; १इत २३:१३
२ इति. २६:१९२इत १६:१०; २५:१५, १६
२ इति. २६:१९गण १२:१०; २रा ५:२७
२ इति. २६:२१लेवी १३:४५, ४६; गण ५:२; १२:१४, १५
२ इति. २६:२१२रा १५:५-७
२ इति. २६:२२यश १:१; ६:१
२ इति. २६:२३२रा १५:३२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ इतिहास २६:१-२३

२ इतिहास

२६ त्यानंतर यहूदाच्या सर्व लोकांनी अमस्याचा मुलगा उज्जीया+ याला त्याच्या वडिलांच्या जागी राजा बनवलं. त्या वेळी तो १६ वर्षांचा होता.+ २ अमस्या राजाचा मृत्यू झाल्यानंतर* उज्जीयाने एलोथ+ शहर पुन्हा बांधलं आणि ते यहूदाच्या सत्तेखाली आणलं.+ ३ उज्जीया+ राजा बनला त्या वेळी तो १६ वर्षांचा होता आणि त्याने ५२ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यखल्या असून ती यरुशलेमची राहणारी होती.+ ४ आपले वडील अमस्या यांच्याप्रमाणेच उज्जीयासुद्धा यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ ५ जखऱ्‍याने उज्जीयाला खऱ्‍या देवाचं भय बाळगायला शिकवलं आणि जखऱ्‍याच्या दिवसांत तो देवाची सेवा करत राहिला. त्याने यहोवाची सेवा केली त्या संपूर्ण काळात, खऱ्‍या देवाच्या आशीर्वादाने त्याची भरभराट झाली.+

६ मग उज्जीयाने पलिष्टी लोकांशी जाऊन युद्ध केलं.+ त्याने गथ,+ यब्ने+ आणि अश्‍दोद+ या शहरांच्या भिंती पाडून टाकल्या आणि शहरांत घुसून त्यांवर कब्जा केला. मग त्याने अश्‍दोदच्या प्रदेशात आणि पलिष्ट्यांच्या बाकीच्या प्रदेशात शहरं बांधली. ७ खरा देव त्याला पलिष्टी लोकांवर, गुरबालमध्ये राहणाऱ्‍या अरबी लोकांवर+ आणि मऊनीमच्या लोकांवर विजय मिळवायला मदत करत राहिला. ८ अम्मोनी लोक+ उज्जीयाला नजराणा* देऊ लागले. हळूहळू त्याची कीर्ती थेट इजिप्तपर्यंत पसरली, कारण तो अतिशय शक्‍तिशाली झाला. ९ उज्जीयाने यरुशलेममध्ये असलेलं ‘खोरं-फाटक’,+ कोपऱ्‍याचा दरवाजा+ आणि आधार-भिंत* यांच्याजवळ मनोरे* बांधले+ आणि ते मजबूत केले. १० याशिवाय, त्याने ओसाड रानातही मनोरे बांधले+ आणि बऱ्‍याच विहिरी खोदल्या* (कारण त्याच्याजवळ भरपूर गुरंढोरं होती). त्याने शेफीलामध्ये आणि मैदानी* प्रदेशातसुद्धा असंच केलं. त्याला शेतीवाडीची फार आवड होती. त्यामुळे डोंगरांवर आणि कर्मेलमध्ये त्याचे बरेच शेतकरी व द्राक्षमळ्यांत काम करणारे लोक होते.

११ यासोबतच, उज्जीयाकडे शस्त्रं घेऊन तयार असलेलं एक मोठं सैन्यही होतं. त्याच्या सैनिकांची दलं सुसंघटितपणे युद्धाच्या मोहिमांवर जायची. राजाच्या अधिकाऱ्‍यांपैकी असलेला हनन्या याच्या आज्ञेवरून, सचिव ईयेल+ आणि प्रमुख मासेया यांनी सैनिकांची संख्या मोजून त्यांची नोंदणी केली.+ १२ या शूर योद्ध्यांवर अधिकारी असलेल्या घराण्यांच्या प्रमुखांची एकूण संख्या २,६०० इतकी होती. १३ त्यांच्या अधिकाराखाली ३,०७,५०० सैनिक शस्त्रं घेऊन युद्धासाठी तयार होते. शत्रूशी लढण्यासाठी राजाला मदत करणारं हे एक शक्‍तिशाली सैन्यदल होतं.+ १४ उज्जीयाने या संपूर्ण सैन्याला ढाली, चिलखत,+ टोप, भाले,+ गोफणीचे दगड+ आणि धनुष्यं देऊन सुसज्ज केलं होतं. १५ शिवाय, त्याने यरुशलेममध्ये कुशल कारागिरांकडून युद्धाची यंत्रं बनवून घेतली होती. आणि ती बुरुजांवर+ आणि शहराच्या भिंतींच्या कोपऱ्‍यांवर ठेवली होती. या यंत्रांनी बाण आणि मोठमोठे दगड फेकून मारले जाऊ शकत होते. उज्जीयाची कीर्ती दूरपर्यंत पसरली. कारण देवाने त्याला खूप मदत केली होती आणि तो शक्‍तिशाली झाला होता.

१६ पण, शक्‍तिशाली झाल्यावर त्याचं मन गर्वाने फुगलं आणि हेच त्याच्या नाशाचं कारण ठरलं. तो आपला देव यहोवा याच्याशी अविश्‍वासूपणे वागला, कारण तो यहोवाच्या मंदिरात धूप वेदीवर, धूप जाळण्यासाठी आत गेला.+ १७ तेव्हा लगेच अजऱ्‍या याजक आणि यहोवाचे इतर ८० धैर्यवान याजक त्याच्यामागे आत गेले. १८ ते उज्जीया राजाला अडवून म्हणाले: “उज्जीया, यहोवासाठी धूप जाळणं हे तुझं काम नाही!+ फक्‍त याजकांनीच धूप जाळला पाहिजे, कारण ते अहरोनचे वंशज आहेत आणि त्यांना पवित्र करण्यात आलंय.+ म्हणून आता पवित्र ठिकाणातून बाहेर जा. तू देवाशी अविश्‍वासूपणे वागलास आणि यासाठी तुला यहोवा देवाकडून कोणताही सन्मान मिळणार नाही.”

१९ पण उज्जीयाचा राग त्यांच्यावर खूप भडकला.+ त्या वेळी, त्याच्या हातात धूप जाळण्यासाठी धूप-पात्र असून तो यहोवाच्या मंदिरात धूपवेदीजवळ उभा होता. तो याजकांवर संतापलेला असतानाच, त्यांच्यासमोर त्याच्या कपाळाला कुष्ठरोग* झाला.+ २० मुख्य याजक अजऱ्‍या आणि त्याच्यासोबत असलेले याजक यांनी उज्जीयाच्या कपाळावर कुष्ठरोग झाल्याचं पाहिलं. तेव्हा ते लगेच त्याला बाहेर नेऊ लागले, आणि उज्जीया स्वतःसुद्धा ताबडतोब बाहेर निघून गेला. कारण यहोवाने त्याला शिक्षा दिली होती.

२१ उज्जीया राजा मरेपर्यंत कुष्ठरोगीच राहिला. कुष्ठरोगामुळे तो वेगळ्या घरात राहायचा,+ कारण त्याला यहोवाच्या मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती. राजाचा मुलगा योथाम हा राजमहालाचा कारभार पाहायचा आणि देशातल्या लोकांचा न्यायनिवाडा करायचा.+

२२ उज्जीयाबद्दलचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा सगळा इतिहास आमोजच्या मुलाने, म्हणजे यशया संदेष्ट्याने+ लिहून ठेवला आहे. २३ मग, उज्जीयाचा मृत्यू झाला* आणि त्याला आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं. पण, त्यांनी त्याला राजांच्या मालकीच्या जमिनीत* पुरलं. कारण ते म्हणाले: “हा कुष्ठरोगी आहे.” मग त्याच्या जागी त्याचा मुलगा योथाम+ राजा बनला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा