वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास २५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ इतिहास रूपरेषा

      • यहूदाचा राजा अमस्या (१-४)

      • अदोमशी युद्ध (५-१३)

      • अमस्या मूर्तिपूजा करतो (१४-१६)

      • इस्राएलचा राजा यहोआश याच्याशी केलेलं युद्ध (१७-२४)

      • अमस्याचा मृत्यू (२५-२८)

२ इतिहास २५:१

समासातील संदर्भ

  • +२रा १४:१-६

२ इतिहास २५:३

समासातील संदर्भ

  • +२इत २४:२६

२ इतिहास २५:४

समासातील संदर्भ

  • +अनु २४:१६

२ इतिहास २५:५

समासातील संदर्भ

  • +१शमु ८:११, १२
  • +गण १:२, ३

२ इतिहास २५:६

तळटीपा

  • *

    एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

२ इतिहास २५:७

समासातील संदर्भ

  • +२इत १९:२

२ इतिहास २५:८

समासातील संदर्भ

  • +२इत १४:११; २०:६

२ इतिहास २५:९

समासातील संदर्भ

  • +१शमु २:७; नीत १०:२२; हाग २:८

२ इतिहास २५:११

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१३; स्तो ६०:उपरीलेखन
  • +२रा १४:७; २इत २०:१०, ११

२ इतिहास २५:१३

समासातील संदर्भ

  • +२इत २५:९
  • +१रा १६:२९
  • +२इत ८:३, ५

२ इतिहास २५:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:३, ५; अनु ७:२५; २इत २८:२२, २३

२ इतिहास २५:१५

समासातील संदर्भ

  • +२इत २४:२०; स्तो ११५:८; यिर्म २:५; १०:५

२ इतिहास २५:१६

समासातील संदर्भ

  • +यश ३०:१०
  • +२इत १६:१०; १८:२५, २६
  • +१शमु २:२५; नीत २९:१

२ इतिहास २५:१७

समासातील संदर्भ

  • +२रा १४:८-१०

२ इतिहास २५:१९

समासातील संदर्भ

  • +२इत २५:११

२ इतिहास २५:२०

समासातील संदर्भ

  • +२रा १४:११-१४
  • +२इत २२:७
  • +२इत २५:१४

२ इतिहास २५:२१

समासातील संदर्भ

  • +यहो २१:८, १६; १शमु ६:१९

२ इतिहास २५:२३

तळटीपा

  • *

    याला अहज्या असंही म्हटलं आहे.

  • *

    सुमारे १७८ मी. (५८४ फूट). अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +नहे ८:१६; १२:३८, ३९
  • +२इत २६:९; यिर्म ३१:३८; जख १४:१०

२ इतिहास २५:२४

समासातील संदर्भ

  • +१रा ७:५१; १५:१८; २रा २४:१२, १३; २५:१३-१५; २इत १२:९

२ इतिहास २५:२५

समासातील संदर्भ

  • +२रा १४:१
  • +२रा १३:१०
  • +२रा १४:१७-२०

२ इतिहास २५:२७

समासातील संदर्भ

  • +२रा १२:२०; १५:८, १०; २१:२३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ इति. २५:१२रा १४:१-६
२ इति. २५:३२इत २४:२६
२ इति. २५:४अनु २४:१६
२ इति. २५:५१शमु ८:११, १२
२ इति. २५:५गण १:२, ३
२ इति. २५:७२इत १९:२
२ इति. २५:८२इत १४:११; २०:६
२ इति. २५:९१शमु २:७; नीत १०:२२; हाग २:८
२ इति. २५:११२शमु ८:१३; स्तो ६०:उपरीलेखन
२ इति. २५:११२रा १४:७; २इत २०:१०, ११
२ इति. २५:१३२इत २५:९
२ इति. २५:१३१रा १६:२९
२ इति. २५:१३२इत ८:३, ५
२ इति. २५:१४निर्ग २०:३, ५; अनु ७:२५; २इत २८:२२, २३
२ इति. २५:१५२इत २४:२०; स्तो ११५:८; यिर्म २:५; १०:५
२ इति. २५:१६यश ३०:१०
२ इति. २५:१६२इत १६:१०; १८:२५, २६
२ इति. २५:१६१शमु २:२५; नीत २९:१
२ इति. २५:१७२रा १४:८-१०
२ इति. २५:१९२इत २५:११
२ इति. २५:२०२रा १४:११-१४
२ इति. २५:२०२इत २२:७
२ इति. २५:२०२इत २५:१४
२ इति. २५:२१यहो २१:८, १६; १शमु ६:१९
२ इति. २५:२३नहे ८:१६; १२:३८, ३९
२ इति. २५:२३२इत २६:९; यिर्म ३१:३८; जख १४:१०
२ इति. २५:२४१रा ७:५१; १५:१८; २रा २४:१२, १३; २५:१३-१५; २इत १२:९
२ इति. २५:२५२रा १४:१
२ इति. २५:२५२रा १३:१०
२ इति. २५:२५२रा १४:१७-२०
२ इति. २५:२७२रा १२:२०; १५:८, १०; २१:२३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ इतिहास २५:१-२८

२ इतिहास

२५ अमस्या राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये २९ वर्षं राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यहोअदान असून ती यरुशलेमची राहणारी होती.+ २ अमस्या यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला, पण पूर्ण मनाने नाही. ३ अमस्याने राज्यावरची पकड मजबूत करताच आपल्या वडिलांचा खून करणाऱ्‍या आपल्या सेवकांना ठार मारलं.+ ४ पण त्या सेवकांच्या मुलांना मात्र त्याने ठार मारलं नाही. कारण, यहोवाने मोशेच्या नियमशास्त्रात जी आज्ञा दिली होती त्याप्रमाणे तो वागला. ती आज्ञा अशी: “मुलांच्या पापासाठी वडिलांना, किंवा वडिलांच्या पापासाठी मुलांना ठार मारलं जाऊ नये. तर प्रत्येकाला स्वतःच्याच पापासाठी ठार मारलं जावं.”+

५ मग अमस्याने यहूदाच्या आणि बन्यामीनच्या सगळ्या माणसांना एकत्र करून त्यांना आपापल्या घराण्यांप्रमाणे उभं केलं; त्याने त्यांना हजारांवर व शंभरांवर अधिकारी असलेल्या त्यांच्या प्रमुखांच्या देखरेखीखाली उभं केलं.+ नंतर, त्याने २० वर्षं आणि त्याहून जास्त वय असलेल्यांची नोंदणी केली.+ तेव्हा ते ३,००,००० प्रशिक्षित योद्धे असल्याचं त्याला दिसून आलं. हे योद्धे मोठ्या ढाली आणि भाले हाताळू शकत होते. ६ याशिवाय, त्याने १०० तालान्त* चांदी देऊन इस्राएलमधून १,००,००० शूर योद्धेही भाड्याने मागवले. ७ पण खऱ्‍या देवाचा एक माणूस त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला: “हे राजा, इस्राएलच्या सैनिकांना आपल्यासोबत घेऊ नकोस. कारण यहोवा इस्राएलसोबत नाही,+ आणि तो एफ्राईमच्या लोकांसोबतही नाही. ८ तू तसं केलंस, तर खरा देव तुझ्या शत्रूपुढे तुला हरवेल. याउलट तूच जा आणि हिंमत धरून लढ. कारण देवाकडे मदत करायची आणि हरवायचीही ताकद आहे.”+ ९ त्यावर अमस्या खऱ्‍या देवाच्या माणसाला म्हणाला: “पण इस्राएलच्या सैन्याला मी १०० तालान्त दिलेत, त्याचं काय?” तेव्हा खऱ्‍या देवाचा माणूस त्याला म्हणाला: “यहोवा तुला त्याहून जास्त देऊ शकतो.”+ १० म्हणून मग अमस्याने एफ्राईमहून आलेल्या त्या सैनिकांना आपापल्या घरी परत पाठवून दिलं. त्यामुळे ते यहूदावर फार चिडले आणि रागाने निघून गेले.

११ त्यानंतर अमस्याने हिंमत धरून आपल्या सैन्याला क्षार खोऱ्‍यात+ युद्धासाठी नेलं. तिथे त्याने सेईरच्या १०,००० सैनिकांना ठार मारलं.+ १२ याशिवाय, यहूदाच्या माणसांनी आणखी १०,००० सैनिकांना जिवंत पकडलं. त्यांनी त्यांना डोंगराच्या शिखरावर नेऊन खाली फेकून दिलं, आणि त्या सगळ्यांचे तुकडे-तुकडे झाले. १३ पण अमस्याने ज्या सैनिकांना आपल्यासोबत युद्धावर न नेता परत पाठवून दिलं होतं,+ ते यहूदाच्या शहरांवर हल्ले करून लूटमार करू लागले. त्यांनी शोमरोनपासून+ थेट बेथ-होरोनपर्यंत+ लूटमार केली. त्यांनी ३,००० लोकांना मारून टाकलं आणि भरपूर माल लुटून नेला.

१४ अमस्या जेव्हा अदोमी लोकांना ठार मारून परत आला, तेव्हा त्याने सेईरमधल्या लोकांची दैवतं आपल्यासोबत आणली आणि त्यांना आपले देव बनवले.+ तो त्यांना नमन करू लागला आणि त्यांच्यासाठी बलिदानांचं हवन करू लागला. १५ त्यामुळे यहोवाचा राग अमस्यावर खूप भडकला, आणि त्याने त्याच्याकडे एका संदेष्ट्याला पाठवलं. तो संदेष्टा अमस्याला म्हणाला: “ज्या देवांनी त्यांच्या स्वतःच्या लोकांना तुझ्या हातून वाचवलं नाही, त्या देवांच्या नादी तू का लागलास?”+ १६ पण त्याचं बोलणं मधेच तोडून राजा त्याला म्हणाला: “गप्प बस्स!+ तू काय राजाचा सल्लागार आहेस?+ तू जर तोंड बंद केलं नाहीस तर तुला मारून टाकलं जाईल.” तेव्हा तो संदेष्टा गप्प बसला. पण त्याआधी तो म्हणाला: “मला माहीत आहे, की देवाने तुझा नाश करायचं ठरवलंय. कारण तू चुकीचं वागलास आणि माझा सल्लाही ऐकला नाहीस.”+

१७ मग यहूदाचा राजा अमस्या आपल्या सल्लागारांशी बोलला. आणि त्याने इस्राएलचा राजा येहू याच्या नातवाला, म्हणजे यहोआहाजचा मुलगा यहोआश याला दूतांच्या हातून असा संदेश पाठवला: “चल, युद्ध करायला ये! आपण समोरासमोर लढू.”+ १८ त्यावर इस्राएलचा राजा यहोआश याने यहूदाचा राजा अमस्या याला असं उत्तर दिलं: “लबानोनच्या काटेरी झुडपाने लबानोनच्या देवदार वृक्षाला एकदा असा निरोप पाठवला: ‘तुझी मुलगी माझ्या मुलाला बायको म्हणून दे.’ पण लबानोनच्या एका जंगली प्राण्याने तिथून जाताना, त्या काटेरी झुडपाला आपल्या पायांखाली तुडवलं. १९ तू म्हणतोस, की तू अदोमला हरवलंस.+ आणि यामुळे आता तुझं मन गर्वाने फुगलंय आणि तुला प्रशंसा हवी आहे. पण तू आपल्या घरातच बसून राहा. संकटाला आमंत्रण का देतोस? स्वतःसोबत यहूदालाही संकटात का पाडतोस?”

२० पण अमस्याने त्याचं ऐकलं नाही.+ अमस्याला आणि त्याच्या लोकांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिलं जावं, अशी खऱ्‍या देवाचीच इच्छा होती.+ कारण ते अदोमच्या देवांची उपासना करू लागले होते.+ २१ म्हणून इस्राएलचा राजा यहोआश यहूदाच्या राजाशी, अमस्याशी युद्ध करायला गेला. आणि ते यहूदामधल्या बेथ-शेमेश+ या ठिकाणी एकमेकांशी लढले. २२ युद्धात इस्राएलने यहूदाला हरवलं, आणि यहूदाचे सगळे सैनिक घरी पळून गेले. २३ मग इस्राएलचा राजा यहोआश याने बेथ-शेमेश इथे यहूदाचा राजा अमस्या याला बंदी बनवलं (अमस्या हा यहोआहाजचा* नातू आणि यहोआशचा मुलगा होता). यहोआशने अमस्याला बंदी बनवून यरुशलेमला आणलं. तिथे त्याने यरुशलेमच्या भिंतीचा ४०० हात* लांब भाग, म्हणजे एफ्राईमच्या दरवाजापासून+ कोपऱ्‍याच्या दरवाजापर्यंतचा+ भाग तोडून टाकला. २४ मग त्याने खऱ्‍या देवाच्या मंदिरात ओबेद-अदोमच्या देखरेखीखाली असलेलं आणि राजमहालाच्या भांडारांत असलेलं सगळं सोनं, चांदी व सगळ्या वस्तू लुटल्या;+ आणि लोकांना बंदी बनवून तो शोमरोनला परत गेला.

२५ यहूदाचा राजा यहोआश याचा मुलगा अमस्या,+ हा इस्राएलचा राजा यहोआहाज याच्या मुलाच्या मृत्यूनंतर, म्हणजे यहोआशच्या+ मृत्यूनंतर आणखी १५ वर्षं जगला.+ २६ अमस्याबद्दलची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी माहिती, यहूदामधल्या आणि इस्राएलमधल्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे. २७ अमस्याने यहोवाच्या मार्गांवर चालायचं सोडून दिलं तेव्हापासून त्याचे शत्रू यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचू लागले;+ म्हणून तो लाखीशला पळून गेला. पण त्याच्या शत्रूंनी लाखीशला त्याच्यामागे माणसं पाठवली आणि त्याला ठार मारलं. २८ मग, त्यांनी त्याचा मृतदेह घोड्यावर टाकून परत आणला; आणि यहूदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांच्या कबरेत त्याला दफन केलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा