वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ४७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • याकोब फारोला भेटतो (१-१२)

      • योसेफ बुद्धिमानपणे व्यवस्था करतो (१३-२६)

      • इस्राएल गोशेनमध्ये राहू लागतो (२७-३१)

उत्पत्ती ४७:१

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:३१
  • +उत्प ४५:१०; निर्ग ८:२२

उत्पत्ती ४७:२

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:१३

उत्पत्ती ४७:३

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:१६; २६:१२, १४; ३१:१७, १८; ४६:३३, ३४

उत्पत्ती ४७:४

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१३; अनु २६:५; स्तो १०५:२३; प्रेका ७:६
  • +प्रेका ७:११
  • +उत्प ४५:१०

उत्पत्ती ४७:६

समासातील संदर्भ

  • +उत्प ४५:१७, १८

उत्पत्ती ४७:९

तळटीपा

  • *

    किंवा “प्रवास करून.”

समासातील संदर्भ

  • +ईयो १४:१, २
  • +उत्प २५:७; ३५:२८

उत्पत्ती ४७:११

समासातील संदर्भ

  • +उत्प ४५:१०; निर्ग १:८, ११; १२:३७; गण ३३:३

उत्पत्ती ४७:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “भाकर.”

उत्पत्ती ४७:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “भाकर.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:३०, ३१

उत्पत्ती ४७:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:५६; ४४:२५

उत्पत्ती ४७:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८८, पृ. ७, ११

उत्पत्ती ४७:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:४८, ४९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८८, पृ. ७-८, ११-१२

उत्पत्ती ४७:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:४५

उत्पत्ती ४७:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८८, पृ. ७, ११

उत्पत्ती ४७:२४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:३४

उत्पत्ती ४७:२५

समासातील संदर्भ

  • +उत्प ४५:५; प्रेका ७:११
  • +उत्प ४७:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८८, पृ. ७

उत्पत्ती ४७:२६

समासातील संदर्भ

  • +उत्प ४७:२२

उत्पत्ती ४७:२७

समासातील संदर्भ

  • +उत्प ४७:४
  • +निर्ग १:७; अनु १०:२२; स्तो १०५:२४; प्रेका ७:१७

उत्पत्ती ४७:२८

समासातील संदर्भ

  • +उत्प ४७:९

उत्पत्ती ४७:२९

समासातील संदर्भ

  • +उत्प ४९:३३
  • +उत्प ४६:४; ५०:१३; प्रेका ७:१५, १६

उत्पत्ती ४७:३०

तळटीपा

  • *

    शब्दशः “वाडवडिलांसोबत झोपी गेल्यावर.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २५:९, १०; ४९:२९, ३०

उत्पत्ती ४७:३१

समासातील संदर्भ

  • +उत्प ५०:५
  • +इब्री ११:२१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ४७:१उत्प ४६:३१
उत्प. ४७:१उत्प ४५:१०; निर्ग ८:२२
उत्प. ४७:२प्रेका ७:१३
उत्प. ४७:३उत्प १२:१६; २६:१२, १४; ३१:१७, १८; ४६:३३, ३४
उत्प. ४७:४उत्प १५:१३; अनु २६:५; स्तो १०५:२३; प्रेका ७:६
उत्प. ४७:४प्रेका ७:११
उत्प. ४७:४उत्प ४५:१०
उत्प. ४७:६उत्प ४५:१७, १८
उत्प. ४७:९ईयो १४:१, २
उत्प. ४७:९उत्प २५:७; ३५:२८
उत्प. ४७:११उत्प ४५:१०; निर्ग १:८, ११; १२:३७; गण ३३:३
उत्प. ४७:१३उत्प ४१:३०, ३१
उत्प. ४७:१४उत्प ४१:५६; ४४:२५
उत्प. ४७:२१उत्प ४१:४८, ४९
उत्प. ४७:२२उत्प ४१:४५
उत्प. ४७:२४उत्प ४१:३४
उत्प. ४७:२५उत्प ४५:५; प्रेका ७:११
उत्प. ४७:२५उत्प ४७:१९
उत्प. ४७:२६उत्प ४७:२२
उत्प. ४७:२७उत्प ४७:४
उत्प. ४७:२७निर्ग १:७; अनु १०:२२; स्तो १०५:२४; प्रेका ७:१७
उत्प. ४७:२८उत्प ४७:९
उत्प. ४७:२९उत्प ४९:३३
उत्प. ४७:२९उत्प ४६:४; ५०:१३; प्रेका ७:१५, १६
उत्प. ४७:३०उत्प २५:९, १०; ४९:२९, ३०
उत्प. ४७:३१उत्प ५०:५
उत्प. ४७:३१इब्री ११:२१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ४७:१-३१

उत्पत्ती

४७ मग योसेफने जाऊन फारोला सांगितलं:+ “माझे वडील आणि भाऊ त्यांचे कळप, गुरंढोरं आणि त्यांच्याजवळ असलेलं सर्वकाही घेऊन कनान देशातून आले आहेत आणि ते गोशेन+ प्रांतात आहेत.” २ योसेफ आपल्या पाच भावांना फारोसमोर घेऊन आला.+

३ फारो त्यांना म्हणाला: “तुम्ही काय काम करता?” यावर ते म्हणाले: “तुमचे सेवक मेंढपाळ आहेत. आमचे पूर्वजही हेच काम करायचे.”+ ४ मग ते म्हणाले: “आम्ही या देशात विदेशी म्हणून राहायला आलो आहोत,+ कारण कनान देशात इतका भयंकर दुष्काळ आहे, की आमच्या कळपांना चरायला गवत नाही.+ म्हणून कृपा करून तुमच्या सेवकांना गोशेन प्रांतात राहू द्या.”+ ५ तेव्हा फारो योसेफला म्हणाला: “तुझे वडील आणि भाऊ इथे तुझ्याकडे आले आहेत. ६ इजिप्तचा सगळा देश तुझ्यासमोर आहे. देशाच्या सगळ्यात चांगल्या भागात तुझ्या वडिलांना आणि भावांना राहू दे.+ त्या सर्वांना गोशेन प्रांतात राहू दे आणि त्यांच्यापैकी तुला जी माणसं योग्य वाटतील, त्यांना माझ्या कळपांवर नेम.”

७ मग योसेफ आपला पिता याकोब याला फारोसमोर घेऊन आला आणि याकोबने फारोला आशीर्वाद दिला. ८ फारोने याकोबला विचारलं: “तुमचं वय किती?” ९ याकोब फारोला म्हणाला: “मी १३० वर्षांचा आहे. माझ्या वाडवडिलांच्या तुलनेत माझ्या आयुष्याची वर्षं फार कमी आणि दुःखाने भरलेली होती.+ या सर्व वर्षांत मीही माझ्या पूर्वजांप्रमाणेच ठिकठिकाणी जाऊन* विदेशी म्हणून राहिलो.”+ १० मग फारोला आशीर्वाद देऊन, याकोब तिथून निघून गेला.

११ योसेफने आपल्या वडिलांना आणि भावांना इजिप्त देशात राहायला जमीन दिली. फारोने आज्ञा दिल्याप्रमाणे, त्याने त्यांना देशातल्या सगळ्यात चांगल्या भागात, म्हणजेच रामसेस+ प्रांतात जागा दिली. १२ मग, योसेफ आपल्या वडिलांना आणि भावांना, आणि आपल्या वडिलांच्या संपूर्ण घराण्याला, प्रत्येक कुटुंबातल्या मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे अन्‍न* पुरवत राहिला.

१३ दुष्काळ खूपच कडाक्याचा असल्यामुळे आता संपूर्ण इजिप्त आणि कनान देशात अजिबात अन्‍न* नव्हतं. दुष्काळामुळे या देशांची फार वाईट स्थिती झाली होती.+ १४ इजिप्त आणि कनान देशांतल्या लोकांनी धान्य खरेदी करण्यासाठी+ आणलेला सर्व पैसा योसेफ फारोच्या घरात जमा करत राहिला. १५ काही काळाने, इजिप्त आणि कनान देशातल्या लोकांजवळचे सर्व पैसे संपले आणि इजिप्तचे लोक योसेफकडे येऊन म्हणू लागले: “आमच्याजवळचे पैसे संपले आहेत. आम्हाला अन्‍न दे, नाहीतर आम्ही तुझ्या डोळ्यांदेखत मरून जाऊ!” १६ यावर योसेफ म्हणाला: “तुमच्याजवळचे पैसे संपले असतील तर तुमची गुरंढोरं द्या, म्हणजे त्यांच्या बदल्यात मी तुम्हाला धान्य देईन.” १७ मग ते आपली जनावरं योसेफकडे आणू लागले. योसेफ त्यांना त्यांच्या गुराढोरांच्या, मेंढरांच्या, घोड्यांच्या आणि गाढवांच्या बदल्यात धान्य देत राहिला. त्याने त्यांना वर्षभर जनावरांच्या बदल्यात धान्य दिलं.

१८ ते वर्ष संपलं, तेव्हा पुढच्या वर्षी ते त्याच्याकडे येऊन म्हणू लागले: “प्रभू, तुझ्यापासून काय लपवायचं? आमच्याजवळ असलेला सगळा पैसा आणि जनावरं आम्ही आधीच तुला दिली आहेत. तेव्हा प्रभू, आता आमचं शरीर आणि जमीन सोडून आमच्याजवळ द्यायला काही उरलेलं नाही. १९ आता आम्ही तुझ्या डोळ्यांदेखत मरून जाऊ आणि आमची जमीनही ओसाड पडेल. म्हणून, तू आम्हाला विकत घे आणि आमच्या जमिनीही घे आणि बदल्यात आम्हाला अन्‍न दे. आम्हाला बियाणं दे, नाहीतर आम्ही मरून जाऊ आणि आमच्या जमिनी ओसाड पडतील.” २० मग योसेफने इजिप्तच्या सर्व लोकांच्या जमिनी फारोसाठी विकत घेतल्या. दुष्काळ खूपच कडाक्याचा असल्यामुळे इजिप्तच्या प्रत्येकाने आपली जमीन विकली. अशा रितीने, संपूर्ण देशातली जमीन फारोची झाली.

२१ मग त्याने लोकांना इजिप्तच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंतच्या शहरांमध्ये हलवलं.+ २२ फक्‍त पुजाऱ्‍यांच्या जमिनी त्याने विकत घेतल्या नाहीत,+ कारण पुजाऱ्‍यांना फारोकडून अन्‍नधान्य पुरवलं जायचं आणि पुजारी त्यावरच जगायचे. म्हणून त्यांनी आपल्या जमिनी विकल्या नाहीत. २३ मग योसेफ लोकांना म्हणाला: “मी तुमच्यासोबतच तुमच्या मालकीच्या जमिनीही फारोसाठी विकत घेतल्या आहेत. हे बियाणं घ्या आणि जमिनीत पेरणी करा. २४ पीक आल्यावर, पाचवा भाग फारोला द्या.+ बाकीचे चार भाग तुमचे असतील. ते तुम्ही पेरणीसाठी, तसंच तुमच्यासाठी, तुमच्या घरच्यांसाठी आणि मुलांसाठी अन्‍न म्हणून वापरा.” २५ तेव्हा ते म्हणाले: “प्रभू, तू आमचा जीव वाचवला आहेस.+ तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे आणि आम्ही फारोचे दास होऊन राहू.”+ २६ मग, योसेफने असं फर्मान काढलं, की पाचवा भाग फारोचा असेल. हे फर्मान आजही इजिप्त देशात पाळलं जातं. फक्‍त पुजाऱ्‍यांची जमीन फारोच्या मालकीची झाली नाही.+

२७ अशा रितीने, इस्राएलचं घराणं इजिप्त देशातल्या गोशेन+ प्रांतात राहू लागलं आणि ते तिथे फलदायी होऊन त्यांची संख्या खूप वाढली.+ २८ याकोब इजिप्त देशात १७ वर्षं राहिला आणि तो १४७ वर्षांचा झाला.+

२९ इस्राएलचा मृत्यू जवळ आला+ तेव्हा तो आपला मुलगा योसेफ याला जवळ बोलावून म्हणाला: “कृपा करून माझ्याबद्दल तुझं एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा दाखव. माझ्या मांडीखाली हात ठेवून मला वचन दे, की तू मला इजिप्तमध्ये पुरणार नाहीस.+ ३० माझा मृत्यू झाल्यावर,* मला इजिप्तमधून बाहेर ने आणि माझ्या वाडवडिलांच्या कबरस्तानात पूर.”+ तेव्हा योसेफ त्याला म्हणाला: “तुम्ही म्हणता तसंच मी करीन.” ३१ मग तो म्हणाला: “शपथ घे.” तेव्हा त्याने शपथ घेतली+ आणि इस्राएलने आपल्या पलंगाच्या उशाशी डोकं टेकवून देवाला नमन केलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा