वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर ५
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ करिंथकर पुस्तकाची रूपरेषा

    • ५

      • स्वर्गातले निवासस्थान धारण करणे (१-१०)

      • समेट घडवून आणण्याची सेवा (११-२१)

        • एक नवीन निर्मिती (१७)

        • ख्रिस्ताच्या वतीने राजदूत (२०)

२ करिंथकर ५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९८, पृ. १५-१६

    ३/१/१९९५, पृ. ३०

२ करिंथकर ५:२

तळटीपा

  • *

    किंवा “या निवासस्थानात.”

  • *

    किंवा “स्वर्गातले आपले निवासस्थान धारण करण्याची.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९८, पृ. १५-१६

२ करिंथकर ५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९८, पृ. १५-१६

२ करिंथकर ५:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२०, पृ. २३

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. २०

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९८, पृ. १५-१६

२ करिंथकर ५:५

तळटीपा

  • *

    किंवा “आगाऊ रक्कम (विसार).”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. १८

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९८, पृ. १५-१६

२ करिंथकर ५:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००५, पृ. १२-१६

    १/१५/१९९८, पृ. ८-१३

    राज्य सेवा,

    ९/१९९६, पृ. १

२ करिंथकर ५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९८, पृ. १५-१६

    ३/१/१९९५, पृ. ३०

२ करिंथकर ५:१०

तळटीपा

  • *

    किंवा “प्रकट केले जाईल.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. १६

२ करिंथकर ५:११

तळटीपा

  • *

    किंवा “देवाला आम्ही प्रकट झालेले असे आहोत.”

  • *

    किंवा “आम्ही प्रकट झालेले असू.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. १६

२ करिंथकर ५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. १६

२ करिंथकर ५:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. १६

२ करिंथकर ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. १३-१४

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०१०, पृ. १५

    ५/१५/२०१०, पृ. २६-२७

    ४/१/२००५, पृ. १२

    १२/१५/१९९८, पृ. १६

    ६/१५/१९९५, पृ. १४-१५

    ६/१/१९९४, पृ. १५-१६

२ करिंथकर ५:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २८

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. १३-१४

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०१०, पृ. १५

    ५/१५/२०१०, पृ. २६-२७

    ४/१/२००५, पृ. १२

    १२/१५/१९९८, पृ. १६-१७

    ९/१/१९८८, पृ. २२, २४-२५

२ करिंथकर ५:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. २८

    १२/१५/१९९८, पृ. १६-१७

२ करिंथकर ५:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. १७

२ करिंथकर ५:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १८

    १२/१५/२०१०, पृ. १२-१४

    १२/१५/१९९८, पृ. १७-१८

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०१९, पृ. २

२ करिंथकर ५:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१०, पृ. १२-१३

    १२/१५/१९९८, पृ. १७-१८

२ करिंथकर ५:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    देवाचे प्रेम, पृ. ५७-५८

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१०, पृ. १२-१४

    ११/१/२००२, पृ. १६

    १२/१५/१९९८, पृ. १८

२ करिंथकर ५:२१

तळटीपा

  • *

    शब्दशः “पाप असे ठरवले.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०००, पृ. १९

    १२/१५/१९९८, पृ. १८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
२ करिंथकर ५:१-२१

२ करिंथकर

५ कारण आपल्याला माहीत आहे, की आपले पृथ्वीवरचे घर, म्हणजे हा तंबू जरी पाडण्यात आला, तरी आपल्याला देवाकडून एक इमारत मिळणार आहे; एक असे घर, जे हातांनी बांधलेले नसून, स्वर्गात असलेले व सर्वकाळाचे आहे. २ कारण सध्याच्या या घरात* आपण अक्षरशः कण्हतो आणि आपल्यासाठी असलेले जे स्वर्गातले आहे, ते घालण्याची* आपण तीव्र उत्कंठा बाळगतो, ३ म्हणजे, जेव्हा आपण ते घालू, तेव्हा आपण उघडे असे आढळणार नाही. ४ खरे पाहता, या तंबूमध्ये असलेले आपण ओझ्याखाली दबून जातो आणि कण्हतो, कारण आपल्याला हे काढून टाकायचे नाही, पण ते दुसरे घालायचेही आहे, यासाठी की जे मरणारे आहे त्याला जीवनाने कायमचे गिळून टाकावे. ५ आता याच गोष्टीसाठी ज्याने आपल्याला तयार केले, तो देव आहे. त्याने आपल्याला येणाऱ्‍या गोष्टींची हमी* म्हणून त्याचा आत्मा दिला आहे.

६ म्हणूनच, आपण नेहमी धैर्य धरतो आणि ही जाणीव बाळगतो, की जोपर्यंत आपण या शरीराच्या घरात राहतो तोपर्यंत आपण प्रभूपासून दूर आहोत, ७ कारण आपण दिसणाऱ्‍या गोष्टींनुसार नाही, तर विश्‍वासाने चालत आहोत. ८ आपण धैर्य धरतो आणि हे शरीर दूर करून प्रभूसोबत राहणे अधिक पसंत करतो. ९ म्हणून, त्याच्यासोबत राहताना काय, किंवा त्याच्यापासून दूर राहताना काय, आपण नेहमीच त्याची स्वीकृती मिळवण्याचा प्रयत्न करतो. १० कारण आपल्या सर्वांनाच ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहावे लागेल,* यासाठी की शरीरात असताना प्रत्येकाने ज्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी केल्या असतील, त्यांनुसार त्याला प्रतिफळ मिळावे.

११ म्हणूनच, प्रभूचे भय बाळगणे गरजेचे आहे हे ओळखून, आम्ही सतत लोकांची मने वळवतो, यासाठी की त्यांनी आमचे ऐकावे; अर्थात, देव आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो;* पण, तुमच्या विवेकांनाही आमची चांगल्या प्रकारे ओळख पटली असेल,* अशी आशा मी बाळगतो. १२ आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला स्वतःची शिफारस करत नाही, तर आमच्याविषयी बढाई मारण्याचे तुम्हाला प्रोत्साहन देत आहोत; यासाठी की जे लोक अंतःकरणातल्या गोष्टींवरून नाही, तर बाहेरच्या स्वरूपावरून बढाई मारतात त्यांना प्रत्युत्तर देणे तुम्हाला शक्य व्हावे. १३ कारण जर आम्ही वेडे झालो होतो, तर ते देवासाठी झालो होतो; आणि जर आम्ही समंजस आहोत, तर ते तुमच्यासाठी आहोत. १४ कारण ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते. आम्हाला ही गोष्ट कळून चुकली आहे, की एकच मनुष्य सर्वांसाठी मेला, कारण खरेतर सर्व मेलेले होते. १५ आणि तो सर्वांसाठी मेला ते या हेतूने, की जे जगतात त्यांनी यापुढे स्वतःसाठी नाही, तर जो त्यांच्यासाठी मेला आणि उठवला गेला, त्याच्यासाठी जगावे.

१६ त्यामुळे, आता आम्ही कोणत्याही मनुष्याकडे मानवी दृष्टिकोनाने पाहत नाही. एकेकाळी जरी आम्ही ख्रिस्ताला शारीरिक दृष्टीने ओळखत होतो, तरीसुद्धा आता आम्ही त्याला निश्‍चितच त्या प्रकारे ओळखत नाही. १७ म्हणून, जो कोणी ख्रिस्तासोबत ऐक्यात आहे, तो एक नवीन निर्मिती आहे; जुन्या गोष्टी गेल्या आहेत, आणि पाहा! नवीन गोष्टी अस्तित्वात आल्या आहेत. १८ पण, सर्व गोष्टी देवाकडून आहेत. त्याने ख्रिस्ताद्वारे आमचा स्वतःसोबत समेट केला आणि समेट घडवून आणण्याची सेवा आमच्या हाती सोपवली. १९ म्हणजे, देव मानवांचे अपराध न मोजता, ख्रिस्ताद्वारे त्यांचा स्वतःसोबत समेट घडवून आणत आहे हे घोषित करण्याची सेवा, आणि हा समेटाचा संदेश त्याने आम्हाला सोपवला आहे.

२० म्हणूनच, आम्ही राजदूत या नात्याने ख्रिस्ताऐवजी कार्य करत आहोत, जणू देव आमच्याद्वारे लोकांना विनंती करत आहे. ख्रिस्ताऐवजी आम्ही लोकांना अशी विनवणी करतो, की “देवासोबत समेट करा.” २१ ज्याला पाप माहीत नव्हते, त्याला त्याने आपल्याकरता पापाचे बलिदान म्हणून दिले,* यासाठी की त्याच्याद्वारे आपण देवाच्या दृष्टीत नीतिमान ठरावे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा