वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर ४
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ करिंथकर पुस्तकाची रूपरेषा

    • ४

      • आनंदाच्या संदेशाचा प्रकाश (१-६)

        • विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांची मने आंधळी (४)

      • मातीच्या भांड्यांत संपत्ती (७-१८)

२ करिंथकर ४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००५, पृ. ८-९

२ करिंथकर ४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००५, पृ. ८-९

    १०/१/१९९७, पृ. १८-२०

    ५/१/१९९७, पृ. ६-७

२ करिंथकर ४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००५, पृ. १४-१६

२ करिंथकर ४:४

तळटीपा

  • *

    किंवा “सध्याच्या काळाच्या.” शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९१, पृ. १२-१५

२ करिंथकर ४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००४, पृ. १६-१७

    ३/१/२००२, पृ. ८

२ करिंथकर ४:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१७, पृ. १०-११

    यहोवाकडं परत या, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०००, पृ. १८

    ३/१५/१९९९, पृ. ११

    २/१/१९९९, पृ. १४

    राज्य सेवा,

    २/२००७, पृ. १

    १/१९९८, पृ. १

२ करिंथकर ४:८

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “आशाहीन स्थितीत सोडण्यात आलेले नाही.”

२ करिंथकर ४:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “विश्‍वासाचा आत्मा.”

२ करिंथकर ४:१६

तळटीपा

  • *

    किंवा “आपले शरीर.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ५/२०१९, पृ. २

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. २८

    ८/१५/२००४, पृ. २५

    ५/१५/१९९६, पृ. ३२

२ करिंथकर ४:१७

तळटीपा

  • *

    किंवा “परीक्षा.”

  • *

    शब्दशः “वजनदार.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०१९, पृ. १

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९६, पृ. २७-२८

२ करिंथकर ४:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. २६-३१

    शुद्ध उपासना, पृ. ३६

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९६, पृ. २७-२९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
२ करिंथकर ४:१-१८

२ करिंथकर

४ देवाने आमच्यावर कृपा करून ही सेवा आमच्यावर सोपवली असल्यामुळे आम्ही धैर्य सोडत नाही. २ पण आम्ही गुप्तपणे केल्या जाणाऱ्‍या लाजिरवाण्या गोष्टी सोडून दिल्या आहेत; आम्ही कपटाने वागत नाही किंवा देवाच्या वचनात भेसळ करत नाही; तर, सत्य जाहीर करून देवासमोर, आम्ही प्रत्येक माणसाच्या विवेकाला पटेल अशा उत्तम वर्तनाने स्वतःची शिफारस करतो. ३ खरे पाहता, जर आम्ही घोषित करत असलेला आनंदाचा संदेश पडद्याने झाकलेला असेल, तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी तो झाकलेला आहे. ४ विश्‍वास न ठेवणाऱ्‍या या लोकांची मने या जगाच्या व्यवस्थेच्या* देवाने आंधळी केली आहेत; या हेतूने, की ख्रिस्त जो देवाचे प्रतिरूप आहे, त्याच्याविषयीच्या गौरवी संदेशाचा प्रकाश त्यांच्यावर चमकू नये. ५ कारण आम्ही स्वतःबद्दल घोषणा करत नाही; तर अशी घोषणा करतो, की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे आणि आम्ही येशूसाठी तुमचे दास आहोत. ६ कारण देवाने स्वतः असे म्हटले: “अंधारातून प्रकाश चमको,” आणि त्याने आमच्या अंतःकरणावर त्याचा प्रकाश पाडून, ख्रिस्ताच्या चेहऱ्‍यावरून प्रतिबिंबित होणाऱ्‍या देवाच्या गौरवी ज्ञानाने आमची अंतःकरणे उजळून टाकली आहेत.

७ तरीसुद्धा, आमची ही संपत्ती मातीच्या भांड्यांत आहे, यासाठी की, आमच्याजवळ असलेले असाधारण सामर्थ्य आमचे स्वतःचे नसून, देवाचे आहे हे दिसून यावे. ८ आमच्यावर सर्व बाजूंनी दबाव आहेत, पण आमचा अगदीच कोंडमारा झालेला नाही; आम्ही गोंधळलेलो आहोत, पण आम्हाला सुटकेचा मार्गच नाही, असे नाही;* ९ आमचा छळ होतो, पण आम्हाला एकटे सोडले जात नाही; आम्हाला खाली पाडले जाते, पण आमचा नाश होत नाही. १० येशूने सोसल्या होत्या तशा मरणयातना आम्ही आमच्या शरीरात सतत सहन करतो, यासाठी की येशूचे जीवन आमच्या शरीरातही प्रकट व्हावे. ११ कारण जिवंत असलेले आम्ही, येशूसाठी सतत मरणाचा सामना करत आहोत, यासाठी की येशूचे जीवन आमच्या मरणाऱ्‍या शरीरातही प्रकट व्हावे. १२ अशा रीतीने, आमच्यामध्ये मरण, तर तुमच्यामध्ये जीवन कार्य करत आहे.

१३ आता आमच्यामध्येही त्याच प्रकारचा विश्‍वास* आहे, ज्याविषयी असे लिहिण्यात आले आहे: “मी विश्‍वास ठेवला, आणि म्हणून मी बोललो.” आम्हीसुद्धा विश्‍वास ठेवला आणि म्हणूनच आम्ही बोलतो, १४ कारण ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, तो येशूसोबत आम्हालाही उठवेल आणि तुमच्यासोबत त्याच्यापुढे सादर करेल हे आम्हाला माहीत आहे. १५ या सर्व गोष्टी तुमच्यासाठीच आहेत, यासाठी की आणखी पुष्कळ जण देवाची उपकारस्तुती करत असल्यामुळे, अपार कृपेचा अधिकाधिक वर्षाव व्हावा व त्याद्वारे देवाचा गौरव व्हावा.

१६ म्हणूनच, आपण धैर्य सोडत नाही. आपला बाहेरचा मनुष्य* जरी हळूहळू झिजत असला, तरीसुद्धा आपला आतला मनुष्य नक्कीच दिवसेंदिवस नवीन होत आहे. १७ कारण आपल्यावर येणारी संकटे* जरी तात्पुरती व हलकी असली, तरी ती आपल्यामध्ये असे गौरवी तेज उत्पन्‍न करते, जे कितीतरी पटीने श्रेष्ठ* असून सर्वकाळाचे आहे. १८ आपण मात्र दिसत असलेल्या गोष्टींकडे नाही, तर न दिसणाऱ्‍या गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दिसत असलेल्या गोष्टी तात्पुरत्या आहेत, पण न दिसणाऱ्‍या गोष्टी सर्वकाळाच्या आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा