वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर ३
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ करिंथकर पुस्तकाची रूपरेषा

    • ३

      • शिफारसपत्रे (१-३)

      • नव्या कराराचे सेवक (४-६)

      • नव्या कराराचे तेज अधिक श्रेष्ठ (७-१८)

२ करिंथकर ३:३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दशः “मांसाच्या पाट्यांवर.”

२ करिंथकर ३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. २८

    २/१५/२००२, पृ. २४-२५

    ११/१५/२०००, पृ. १७-१९

२ करिंथकर ३:६

तळटीपा

  • *

    किंवा “देवाच्या क्रियाशील शक्‍तीचे.” शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००२, पृ. २४-२५

    ११/१५/२०००, पृ. १७-१९

२ करिंथकर ३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००५, पृ. १३-१४

    ३/१५/२००४, पृ. १६

    २/१/१९९८, पृ. १०

    ३/१/१९९५, पृ. १९

२ करिंथकर ३:१६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१८, पृ. ९

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००५, पृ. १६-१७

२ करिंथकर ३:१७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१८, पृ. १९-२०

    ४/२०१८, पृ. ८-९

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१२, पृ. १०

२ करिंथकर ३:१८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा कदाचित, “यहोवाचा आत्मा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१२, पृ. २३-२४

    ९/१/२००५, पृ. ८-९, १७

    ३/१५/२००४, पृ. १६-१७

    ११/१/१९९०, पृ. ३०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
२ करिंथकर ३:१-१८

२ करिंथकर

३ आम्हाला आता पुन्हा स्वतःची शिफारस करावी लागणार आहे का? किंवा, काही माणसांप्रमाणे आम्हाला तुमच्यासाठी किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रे लिहून घेण्याची गरज आहे का? २ तुम्ही स्वतःच आमचे पत्र आहात, जे आमच्या हृदयावर लिहिलेले आहे आणि सर्व माणसांना त्याविषयी माहीत आहे व सर्व ते वाचत आहेत. ३ कारण तुम्ही ख्रिस्ताचे पत्र आहात हे स्पष्टच आहे. आणि सेवक या नात्याने आम्ही हे पत्र लिहिले आहे, शाईने नाही तर एका जिवंत देवाच्या आत्म्याने;* आणि दगडी पाट्यांवर नाही, तर आम्ही ते हृदयांवर* लिहिले आहे.

४ देवासमोर ख्रिस्ताद्वारे आम्हाला हा आत्मविश्‍वास आहे. ५ खरेतर, स्वतःच्या बळावर कोणतेही कार्य करण्यासाठी आमच्याजवळ पुरेशी पात्रता नाही. पण, स्वतः देव आम्हाला ही पात्रता देतो. ६ त्याने खरोखरच आम्हाला पुरेशी पात्रता दिली आहे, यासाठी की आम्ही लिखित नियमांचे नाही, तर एका नव्या कराराचे आणि पवित्र आत्म्याचे* सेवक व्हावे; कारण, लिखित नियम मृत्युदंडास पात्र ठरवतात, पण पवित्र आत्मा जिवंत करतो.

७ शिवाय, ज्यांद्वारे मृत्यू येतो आणि जे दगडांवर लिहिण्यात आले ते लिखित नियम इतक्या गौरवी तेजासहित देण्यात आले, की मोशेच्या चेहऱ्‍यावरच्या तेजामुळे इस्राएली लोकांना त्याच्याकडे पाहणे शक्य नव्हते. पण, हे तेज पुढे नाहीसे होणार होते. ८ तर मग, पवित्र आत्मा हा आणखी जास्त गौरवी तेजासहित दिला जाऊ नये का? ९ कारण जर दंडास पात्र ठरवणारे नियम तेजस्वी होते, तर मग ज्याद्वारे नीतिमान ठरवले जाते ते आणखी किती तेजस्वी असेल! १० खरेतर, ज्याला एकेकाळी गौरवी तेजाने समृद्ध करण्यात आले होते, त्याचे तेज काढून घेण्यात आले आहे, कारण जे नंतर आले ते त्यापेक्षा जास्त तेजस्वी आहे. ११ कारण, जे नाहीसे होणार होते, ते जर इतक्या गौरवी तेजाने आणण्यात आले, तर मग जे टिकून राहते त्याचे तेज कितीतरी पटीने जास्त असेल!

१२ आपल्याला अशी आशा असल्यामुळे आपण अगदी मोकळेपणाने बोलतो, १३ आणि मोशे जसे करायचा, तसे आपण करत नाही; जे नाहीसे होणार होते त्याच्या शेवटाकडे इस्राएली लोकांनी एकसारखे पाहू नये, म्हणून तो आपला चेहरा पडद्याने झाकून घ्यायचा. १४ पण, त्या लोकांची बुद्धी मंद झाली होती. खरे पाहता, आजपर्यंत जेव्हाही जुन्या कराराचे वाचन केले जाते, तेव्हा त्यांचे हृदय पूर्वीसारखेच पडद्याने झाकलेले असते, कारण तो पडदा फक्‍त ख्रिस्ताद्वारे काढून टाकला जातो. १५ खरेतर, आजही जेव्हा जेव्हा मोशेची लिखाणे वाचली जातात, तेव्हा तेव्हा त्यांचे हृदय जणू पडद्याने झाकलेले असते. १६ पण, जेव्हा कोणी यहोवाकडे* वळतो तेव्हा हा पडदा काढून टाकला जातो. १७ यहोवा* आत्मिक व्यक्‍ती आहे आणि जिथे कुठे यहोवाचा* आत्मा आहे, तिथे स्वातंत्र्य आहे. १८ आपले चेहरे पडद्याने झाकलेले नाहीत, तर आपण सर्व आरशांसारखे यहोवाचे* तेज प्रतिबिंबित करतो. आणि असे करत असताना, आपले स्वरूप देवासारखे बनत चालले आहे. यहोवा,* जो आत्मिक आहे, तो* ज्याप्रमाणे आपले रूपांतर घडवून आणत आहे अगदी त्याचप्रमाणे आपण दिवसेंदिवस त्याचे तेज अधिकाधिक प्रतिबिंबित करत आहोत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा