वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१५ पृ. ५
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आपली राज्य सेवा—२०१५
आपली राज्य सेवा—२०१५
km ४/१५ पृ. ५

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

२७ एप्रिल २०१५ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रत्येक मुद्द्‌यावर कधी चर्चा करण्यात आली त्याची तारीख देण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक आठवडी प्रशालेची तयारी करताना संशोधन करता येईल.

  1. प्रेमदया म्हणजे काय आणि आपल्या सहविश्‍वासू बांधवांना आपण ते कसे दाखवू शकतो? (रूथ १:१६, १७) [मार्च २, टेहळणी बुरूज १० ८/१५ पृ. २१ परि. ३; पृ. २४ परि. १६]

  2. रूथला “सद्‌गुणी स्त्री” हे नाव कसे मिळाले? (रूथ ३:११) [मार्च २, टेहळणी बुरूज ०५ ३/१ पृ. २८ परि. ६]

  3. आपल्याला समस्यांना तोंड द्यावे लागते तेव्हा हन्‍नाच्या उदाहरणावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? (१ शमु. १:१६-१८) [मार्च ९, टेहळणी बुरूज ०९ १२/१५ पृ. १७ परि. ९]

  4. शमुवेल “परमेश्‍वरासमोर” लहानाचा मोठा होत असताना, कोणत्या गोष्टींमुळे तो एलीच्या मुलांच्या वाईट उदाहरणापासून सुरक्षित राहिला? (१ शमु. २:२१) [मार्च ९, टेहळणी बुरूज ११ ४/१ पृ. १६ परि. २-३]

  5. अधम लोकांनी शौलाचे राज्यपद स्वीकारले नाही तरी त्याने त्यांच्याविरुद्ध कोणतेही अविचारी कृत्य केले नाही. यावरून आपण कोणता धडा शिकतो? (१ शमु. १०:२२, २७) [मार्च २३, टेहळणी बुरूज ०५ ४/१ पृ. २० परि. १]

  6. आज्ञा पाळण्याऐवजी यज्ञ दिले तरी यहोवा खूश होईल या शौलाच्या चुकीच्या विचारातून आपण कोणता महत्त्वाचा धडा शिकू शकतो? (१ शमु. १५:२२, २३) [मार्च ३०, टेहळणी बुरूज ०७ ७/१ पृ. १९ परि. ३-४]

  7. यहोवा आपल्याला किती चांगल्या प्रकारे ओळखतो? (१ शमु. १६:७) [एप्रि. ६, टेहळणी बुरूज ०९ ११/१५ पृ. ५ परि. १३]

  8. नीतिसूत्रे १:४ नुसार कठीण प्रसंगांना तोंड देताना आपण कशाचा उपयोग करावा अशी यहोवा अपेक्षा करतो? (१ शमु. २१:१२, १३) [एप्रि. १३, टेहळणी बुरूज ०५ ४/१ पृ. २१ परि. ४]

  9. अबीगईलने दावीद आणि त्याच्या लोकांना अन्‍न सामग्री पुरवली तेव्हा ती तिच्या पतीच्या मस्तकपदाविरुद्ध बंड करत होती का? (१ शमु. २५:१०, ११, १८, १९) [एप्रि. २०, टेहळणी बुरूज १० १/१ पृ. १६ परि. ३]

  10. अबीगईलने तिची चूक नसतानाही माफी मागितली. तिच्या या उदाहरणातून आपण कोणता धडा शिकतो? (१ शमु. २५:२४) [एप्रि. २०, टेहळणी बुरूज ०२ ११/१ पृ. ५ परि. १, ४]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा