वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp19 क्र. २ पृ. ४-५
  • नैसर्गिक विपत्ती येते तेव्हा . . .

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नैसर्गिक विपत्ती येते तेव्हा . . .
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलमधून सत्य जाणून घेतल्यामुळे आपल्याला आशा मिळते
  • तुम्ही तयार आहात का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • आपली सर्व चिंता यहोवावर टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • आपण चिंतेचा सामना करताना मन शांत कसं ठेवू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • यहोवावर आपल्या सर्व चिंता टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
wp19 क्र. २ पृ. ४-५
इमारत पडलेल्या ठिकाणी दोन पुरुष बसले आहेत

नैसर्गिक विपत्ती येते तेव्हा . . .

सिएरा लियोन इथे राहणारे अन्ड्रू म्हणतात: “सुरुवातीला आम्हाला अगदी आशाहीन वाटलं. होतं नव्हतं ते सगळं आम्ही पुरामुळे आणि भूस्खलनामुळे गमावलं.”

वर्जिन बेटे इथे राहणारे डेवीड म्हणतात: “चक्रीवादळ संपल्यावर आम्ही घरी गेलो तेव्हा तिथे काहीच उरलं नव्हतं. सर्वकाही पाहून आम्हाला धक्काच बसला. माझी मुलगी तर धपकन खाली बसली आणि रडू लागली.”

तुम्हीही कधी नैसर्गिक विपत्तीचा सामना केला आहे का? असल्यास इतर लोकांसारखा तुमचाही गोंधळ उडाला असेल, तुम्हाला धक्का बसला असेल, नैराश्‍य आलं असेल आणि नंतर भयानक स्वप्नंही पडली असतील. बरेचसे पीडित जण खूप हताश होतात आणि पार थकून गेलेले असतात. दुःखातून बाहेर पडण्याची त्यांची इच्छाच नसते.

एखाद्या विपत्तीत तुम्ही आपलं सर्वकाही गमावलं असेल, तर तुम्हालाही कदाचित वाटेल की आता पुरे झालं! हे सर्व माझ्या सहनशक्‍तीच्या पलीकडे आहे. जगण्यात काहीच अर्थ नाही असंही कदाचित तुम्हाला वाटेल. पण बायबल आपल्याला सांगतं, की तुमच्या जीवनाला नक्कीच अर्थ आहे  आणि चांगल्या भविष्याची एक पक्की आशा तुमच्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे.

बायबलमधून सत्य जाणून घेतल्यामुळे आपल्याला आशा मिळते

उपदेशक ७:८ म्हणतं: “एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा.” विपत्तीनंतर सुरुवातीला तुम्हाला खूप आशाहीन वाटेल. पण जीवन हळूहळू पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्यावर तुम्हाला बरं वाटू लागेल.

बायबल पुढे येणाऱ्‍या अशा एका काळाबद्दल सांगतं, जेव्हा “शोकाचा व आकांताचा शब्द पुनः ऐकू येणार नाही.” (यशया ६५:१९) देवाचं राज्य या पृथ्वीचं रूपांतर एका सुंदर नंदनवनात करेल तेव्हा हे घडेल. (स्तोत्र ३७:११, २९) पुन्हा कधीच नैसर्गिक विपत्ती येणार नाही. नैसर्गिक विपत्तीमुळे प्रभावीत झालेल्या पीडितांना ज्या कटू आठवणी आणि शारीरिक किंवा मानसिक वेदना सहन कराव्या लागतात, त्या सर्व कायमच्या काढून टाकण्यात येतील. कारण आपल्या सर्वशक्‍तिमान देवाने वचन दिलं आहे: “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.”​—यशया ६५:१७.

जरा विचार करा: “तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे.” असं तुमचा निर्माणकर्ता म्हणतो. याचाच अर्थ, देवाच्या राज्यात तुम्हाला एक शांतीपूर्ण जीवन मिळेल. (यिर्मया २९:११, ईझी-टू-रीड व्हर्शन) हे सत्य माहीत झाल्यावर तुमच्या जीवनाला अर्थ आहे असं तुम्हाला वाटत नाही का? आधीच्या लेखात उल्लेख केलेली सॅली म्हणते: “देवाचं राज्य आपल्यासाठी भविष्यात कोणत्या चांगल्या गोष्टी करणार आहे हे स्वतःला आठवण करून दिल्यावर, तुम्हाला भूतकाळात घडलेल्या गोष्टी मागे सोडून द्यायला आणि सध्याच्या परिस्थितीचा सामना करायला मदत होईल.”

देवाचं राज्य मानवांसाठी लवकरच कोणकोणत्या गोष्टी करणार आहे याबद्दल जाणून घ्यायला आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत. तुम्ही विपत्तीचा सामना केला असला तरी देवाच्या राज्याबद्दल शिकून घेतल्याने तुम्हाला एक पक्की आशा मिळते की आज जीवन जगण्याला अर्थ आहे, कारण लवकरच भविष्यात कोणतीही विपत्ती राहणार नाही. पण सध्या, विपत्तीमुळे झालेल्या परिणामांतून सावरायला मदतीच्या ठरतील अशा काही बायबलमधल्या व्यावहारिक मार्गदर्शनांवर आता आपण चर्चा करू या.

मदतदायी ठरणारी बायबलमधली वचनं

पुरेशी झोप घ्या.

“कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या दोन मुठीपेक्षा शांतीने भरलेली एक मूठ पुरवली.”​—उपदेशक ४:६.

संशोधकांच्या मते विपत्तीनंतर एका व्यक्‍तीला “जर पुरेशी झोप मिळत नसेल . . . तर तिला आणखी त्रास होतो आणि भावनिक समस्या निर्माण होतात.” त्यामुळे चांगला आराम मिळणं खूप महत्त्वाचं आहे.

आपलं मन मोकळं करा.

“मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.”​—नीतिसूत्रे १२:२५.

आपल्या कुटुंबातल्या सदस्याकडे किंवा जवळच्या मित्राकडे तुम्ही आपल्या भावना व्यक्‍त करू शकता. तुमचं ऐकून घेण्यासोबत ते प्रोत्साहनदायक शब्दांनी आणि काही व्यावहारिक मार्गांनी तुम्हाला मदतही करतील.a

भविष्यात घडणाऱ्‍या चांगल्या गोष्टींबद्दल विचार करा.

“त्याच्या अभिवचनानुसार आपण एका नव्या आकाशाची व नव्या पृथ्वीची वाट पाहत आहोत आणि तिथे न्यायनीती टिकून राहील.”​—२ पेत्र ३:१३.

a एक व्यक्‍ती जर दीर्घकाळापासून नैराश्‍याचा किंवा तीव्र चिंतेचा सामना करत असेल तर तिला वैद्यकीय उपचाराची गरज पडू शकते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा