ख्रिस्ती जीवन
तुम्ही तयार आहात का?
तुमच्या भागात एखादी नैसर्गिक विपत्ती आली तर तिला तोंड द्यायला तुम्ही तयार आहात का? भूकंप, चक्रीवादळ, वणवा आणि पूरासारखी संकटं आपल्यावर अचानक येऊ शकतात आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसानही होऊ शकतं. यासोबतच, अतिरेकी हल्ले, सामाजिक तणावाचं वातावरण आणि साथीच्या रोगांसारख्या गोष्टीसुद्धा अचानक केव्हाही आणि कुठेही निर्माण होऊ शकतात. (उप ९:११) त्यामुळे आपण राहतो त्या ठिकाणी या गोष्टी कधीच होणार नाहीत, असा विचार आपण करू नये.
तेव्हा, संकटांचा सामना करायचा असेल तर आपल्यातल्या प्रत्येकाने योग्य ती पावलं उचलून, आधीच तयारी केली पाहिजे. (नीत २२:३) हे खरं आहे, की अशा प्रकारची संकटं येतात तेव्हा आपली संघटना आपल्याला काही प्रमाणात मदत पुरवते. पण म्हणून अशा गोष्टींसाठी आपल्याला तयारी करायची काहीच गरज नाही, असा याचा अर्थ होत नाही.—गल ६:५, तळटीप.
नैसर्गिक विपत्तीसाठी तुम्ही तयार आहात का? हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
यहोवासोबत असलेल्या घनिष्ठ नातेसंबंधामुळे विपत्तीच्या काळात तुम्हाला कशी मदत होऊ शकते?
विपत्तीच्या काळात खालील गोष्टी करणं का महत्त्वाचं आहे?
• विपत्तीच्या आधी, दरम्यान आणि नंतर मंडळीतल्या वडिलांच्या संपर्कात राहणं.
• इमर्जन्सी किट तयार ठेवणं.—सजग होइए!१७.५ पृ. ६
• आपल्या भागात कोणत्या प्रकारची संकटं येऊ शकतात याचा अंदाज घेऊन त्या परिस्थितीत काय करता येईल यावर चर्चा करणं.
कोणत्या तीन मार्गांनी आपण विपत्तीग्रस्त लोकांना मदत करू शकतो?