वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll भाग २ पृ. ६-७
  • खरा देव कोण आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरा देव कोण आहे?
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मिळती जुळती माहिती
  • भाग २
    देवाचं ऐका
  • तुम्हाला कोणी उत्पन्‍न केले?
    भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
  • देवाबद्दलचं सत्य
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • देव कोण आहे?
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
अधिक माहिती पाहा
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll भाग २ पृ. ६-७

भाग २

खरा देव कोण आहे?

यहोवा त्याच्या राजासनावरून, स्वर्गात आणि पृथ्वीवर त्याने जे काही बनवलं त्याकडे पाहतो

सगळ्या गोष्टी निर्माण करणारा खरा देव फक्‍त एकच आहे आणि त्याचं नाव यहोवा आहे. (स्तोत्र ८३:१८) तो स्वर्गात राहतो. आपण त्याला पाहू शकत नाही. त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपणही त्याच्यावर प्रेम करावं असं त्याला वाटतं. तसंच, आपण दुसऱ्‍यांवरही प्रेम करावं अशी त्याची इच्छा आहे. (मत्तय २२:३५-४०) तो सगळ्यात शक्‍तिशाली आहे आणि त्यानेच सर्व गोष्टी बनवल्या आहेत.

सगळ्यात आधी देवाने एका शक्‍तिशाली स्वर्गदूताला बनवलं. हा स्वर्गदूत नंतर पृथ्वीवर आला आणि लोक त्याला येशू ख्रिस्त या नावाने ओळखू लागले. या स्वर्गदूताला बनवल्यानंतर यहोवाने आणखी स्वर्गदूतांनाही बनवलं.

स्वर्गात जे काही आहे ते सगळं यहोवाने बनवलं . . . आणि पृथ्वीवरच्याही सगळ्या गोष्टी त्यानेच बनवल्या. प्रकटीकरण ४:११

यहोवाने सूर्य, चंद्र आणि तारे बनवले. तसंच त्याने पृथ्वी आणि तिच्यावर असलेल्या सगळ्या गोष्टी बनवल्या.—उत्पत्ती १:१.

यहोवा देवाने पहिल्या मानवाला मातीपासून बनवलं; त्याचं नाव आदाम होतं.—उत्पत्ती २:७.

  • आपण यहोवाची भक्‍ती का केली पाहिजे?—यशया ४२:५.

  • देवाच्या स्वभावातले काही गुण कोणते आहेत?—निर्गम ३४:६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा