वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll भाग १ पृ. ४-५
  • आपण देवाचं कसं ऐकू शकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण देवाचं कसं ऐकू शकतो?
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मिळती जुळती माहिती
  • भाग १
    देवाचं ऐका
  • बायबल—देवाकडून आलेलं पुस्तक
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • बायबल त्याच्या लेखकाबद्दल काय सांगतं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • देवाने दिलेल्या सल्ल्यांचा तुम्हालाही फायदा होऊ शकतो
    सावध राहा!—२०२१
अधिक माहिती पाहा
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll भाग १ पृ. ४-५

भाग १

आपण देवाचं कसं ऐकू शकतो?

देव आपल्याशी बायबलमधून बोलतो. २ तीमथ्य ३:१६

यहोवाने स्वर्गातून पवित्र शक्‍तीद्वारे आपल्या सेवकांना बायबलमध्ये काय लिहायचं ते सांगितलं

खऱ्‍या देवाने आपले विचार एका पवित्र पुस्तकात लिहून ठेवायला काही लोकांना सांगितलं. ते पुस्तक म्हणजे बायबल. त्यात खूप महत्त्वाची आणि उपयोगी माहिती आहे. आणि देवाची इच्छा आहे, की तुम्ही ही माहिती जाणून घ्यावी.

आपलं भलं कशात आहे, हे देवालाच माहीत आहे. फक्‍त तोच आपल्याला बुद्धी देऊ शकतो. आपण त्याचं ऐकलं, तर आपण बुद्धिमान होऊ.—नीतिवचनं १:५.

बायबल वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे; एक माणूस आपल्या भाषेत बायबल वाचत आहे

देवाची इच्छा आहे की जगातल्या सगळ्या लोकांनी बायबल वाचावं. आज बायबल पुष्कळ भाषांमध्ये वाचायला मिळतं.

तुम्हाला देवाचं ऐकायचं असेल, तर तुम्ही बायबल वाचलं पाहिजे आणि त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

आज पूर्ण जगात लोक देवाबद्दल शिकून घेत आहेत. मत्तय २८:१९

एक यहोवाचा साक्षीदार एका माणसाला बायबलमधून वचन वाचून दाखवतो, आणि मग त्याच्यासोबत बायबलचा अभ्यास करतो

यहोवाचे साक्षीदार तुम्हाला बायबलमध्ये दिलेल्या माहितीचा अर्थ समजायला मदत करू शकतात.

ते पूर्ण जगात लोकांना देवाबद्दल खरी माहिती देतात.

यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहातली सभा

ही माहिती शिकून घेण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात गेला, तर तुम्हाला देवाबद्दल आणखी शिकून घेता येईल.

  • देवाचं वचन सत्य आहे.—योहान १७:१७.

  • आपण देवावर भरवसा का ठेवू शकतो?—गणना २३:१९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा