वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll भाग ३ पृ. ८-९
  • एदेन बागेत जीवन कसं होतं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एदेन बागेत जीवन कसं होतं?
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांनी आपलं घर का गमावलं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • सैतानाचं ऐकल्यामुळे काय झालं?
    देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • भाग ३
    देवाचं ऐका
  • आदाम आणि हव्वा यांनी देवाचं ऐकलं नाही
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll भाग ३ पृ. ८-९

भाग ३

एदेन बागेत जीवन कसं होतं?

यहोवाने आदाम आणि हव्वाला पुष्कळ चांगल्या गोष्टी दिल्या होत्या. उत्पत्ती १:२८

हव्वाला निर्माण केल्यावर यहोवा तिला आदामकडे आणतो

आदामला बनवल्यावर यहोवाने स्त्रीला निर्माण केलं. तिचं नाव हव्वा होतं. यहोवाने तिला आदामकडे आणलं आणि ती त्याची बायको झाली.—उत्पत्ती २:२१, २२.

यहोवाने त्यांना मनाने आणि शरीराने परिपूर्ण बनवलं होतं, म्हणजेच त्यांच्यामध्ये कोणताही दोष नव्हता.

आदाम आणि हव्वा ते राहत असलेल्या सुंदर नंदनवनाकडे पाहत आहेत

ते एदेन बागेत, एका सुंदर नंदनवनात राहत होते. त्या बागेत एक नदी होती आणि वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आणि प्राणीही होते.

यहोवा त्यांच्याशी बोलायचा आणि त्यांना शिकवायचा. त्यांनी यहोवाचं ऐकणं गरजेचं होतं. त्यांनी त्याचं ऐकलं असतं, तर ते कायम पृथ्वीवरच्या त्या नंदनवनात राहू शकले असते.

बागेतल्या एका झाडाचं फळ खाऊ नका, असं देवाने सांगितलं होतं. उत्पत्ती २:१६, १७

यहोवाने आदाम आणि हव्वाला या झाडाचं फळ खायची मनाई केली होती

एक स्वर्गदूत देवाचा विरोधी बनला. तो दुष्ट स्वर्गदूत म्हणजे दियाबल सैतान.

दुष्ट स्वर्गदूत दियाबल सैतान, सापाचा उपयोग करून हव्वाशी बोलतो

यहोवाने आदाम आणि हव्वाला बागेतल्या एका झाडाचं फळ खाऊ नका असं सांगितलं. त्यांनी जर ते फळ खाल्लं, तर ते मरतील असं तो म्हणाला.

आदाम आणि हव्वाने यहोवाचं ऐकू नये असं सैतानाला वाटत होतं. म्हणून तो एका सापाद्वारे हव्वाशी बोलला. तो तिला म्हणाला, की तिने झाडाचं फळ खाल्लं तर ती मरणार नाही; उलट, ती देवासारखी होईल. पण सैतानाने सांगितलेली ही गोष्ट साफ खोटी होती.—उत्पत्ती ३:१-५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा