वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g20 क्र. १ पृ. ५-७
  • तणाव म्हणजे काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तणाव म्हणजे काय?
  • सावध राहा!—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चांगला तणाव आणि वाईट तणाव
  • तणाव, चांगला आणि वाईट
    सावध राहा!—१९९८
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२०
  • तणाव—नावाचे “स्लो पॉइझन”
    सावध राहा!—१९९८
  • तुम्ही तणावात आहात का?
    सावध राहा!—२०२०
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२०
g20 क्र. १ पृ. ५-७
शहरात एक बिजनेस करणारा माणूस एका ऑफिसची पायरी घाईघाईने चढत आहे.

तणाव कसा कमी कराल?

तणाव म्हणजे काय?

एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला शरीर देत असलेला प्रतिसाद म्हणजे तणाव. तुमचा मेंदू तुमच्या शरीरातल्या सर्व भागांना भरपूर प्रमाणात हॉर्मोन्स पाठवतो. यामुळे तुमच्या हृदयाची गती, रक्‍तदाब, श्‍वास घेण्याचा वेग वाढतो आणि तुमच्या स्नायूंवर ताण येतो. तुमच्यासोबत काय घडत आहे याची पूर्णपणे जाणीव होण्याआधीच तुमचं शरीर तणावाचा सामना करायला तयार होतं. तणावपूर्ण परिस्थिती निघून गेल्यावर आपलं शरीर पूर्व स्थितीत येतं.

चांगला तणाव आणि वाईट तणाव

तणाव ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. एखाद्या आव्हानात्मक किंवा धोकेदायक परिस्थितीचा सामना करण्यासाठी या प्रतिक्रियेमुळे आपल्याला मदत होते. ही प्रतिक्रिया मेंदूमध्ये सुरू होते. चांगल्या प्रकारच्या तणावामुळे तुम्हाला लगेच कार्य करण्यासाठी किंवा प्रतिक्रिया देण्यासाठी मदत होते. काही प्रमाणात तणाव आल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला आणि आणखी चांगल्या प्रकारे काम करायला मदत होऊ शकते. जसं की परीक्षेत असताना, इंटरव्यू देताना किंवा खेळांच्या स्पर्धेत भाग घेताना.

पण जास्त काळापर्यंत तीव्र किंवा सतत येणाऱ्‍या तणावामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुमचं शरीर तणावाचा सामना करण्यासाठी सतत तयार असल्यामुळे तुम्हाला शारीरिक, भावनिक आणि मानसिक रीत्या त्रास होऊ शकतो. यामुळे तुमच्या इतरांसोबतच्या वागण्याबोलण्यात बदल होऊ शकतो. ज्या लोकांना जास्त काळापर्यंत तणावाचा सामना करावा लागतो ते कदाचित अती प्रमाणात दारू पितात, ड्रग्स घेतात, जास्त प्रमाणात खातात, धूम्रपान करतात, औषधांचा दुरुपयोग करतात आणि स्वतःला इतर वाईट सवयी लावून घेतात. यामुळे एका व्यक्‍तीला पुढे जाऊन नैराश्‍य येऊ शकतं, ती पार गळून जाऊ शकते किंवा तिच्या मनात आत्महत्येचा विचारही येऊ शकतो.

तणावाचा सर्वांवर सारखाच परिणाम होत नसला तरी यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. आणि याचा परिणाम जवळजवळ शरीराच्या सर्वच भागांवर होऊ शकतो.

तणावाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो?

मज्जा संस्था.

एक माणूस तणावात आहे आणि त्याला त्याचे परिणाम जाणवत आहे.

तणावामुळे तुमची मज्जा संस्था एड्रेनालाईन आणि कॉर्टिसॉल यांसारखे हॉर्मोन्स निर्माण करते. यामुळे तुमच्या हृदयाची गती, रक्‍तदाब आणि रक्‍तातलं ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. या सर्व गोष्टींमुळे तुमचं शरीर धोकेदायक परिस्थितीचा सामना करायला तयार होतं. जास्त प्रमाणात असलेल्या तणावामुळे पुढे दिलेल्या गोष्टी होऊ शकतात.

  • चिडचिडेपणा, चिंता, नैराश्‍य, डोकेदुखी, झोप न लागणं

हाडं व स्नायू संस्था.

तणावपूर्ण परिस्थितीत तुम्हाला इजा होऊ नये म्हणून तुमचे स्नायू ताठ होतात. जास्त प्रमाणात असलेल्या तणावामुळे पुढे दिलेल्या गोष्टी होऊ शकतात.

  • अंगदुखी, डोकेदुखी आणि स्नायूत पेटके किंवा गोळे येणं

श्‍वसन संस्था.

तणावपूर्ण परिस्थितीत शरीराला जास्त प्रमाणात ऑक्सिजन हवा असतो आणि म्हणून तुमची श्‍वास घेण्याची गती वाढते. जास्त प्रमाणात असलेल्या तणावामुळे पुढे दिलेल्या गोष्टी होऊ शकतात.

  • श्‍वास घेण्याचा वेग वाढणं, धाप लागणं आणि तीव्र भीतीचे झटके येण्याची समस्या असणाऱ्‍यांना ते येणं

हृदय व रक्‍तवाहिन्यांची संस्था.

तणावपूर्ण परिस्थितीत तुमच्या शरीरात सगळीकडे रक्‍तपुरवठा व्हावा म्हणून तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. रक्‍तवाहिन्या आकुंचन व प्रसरण पावतात. यामुळे तुमच्या शरीरातल्या ज्या भागाला रक्‍ताची जास्त गरज असते तिथे रक्‍तपुरवठा होतो. जसं की, स्नायूंना. जास्त प्रमाणात असलेल्या तणावामुळे पुढे दिलेल्या गोष्टी होऊ शकतात.

  • उच्च रक्‍तदाब, हृदयाचा झटका, ब्रेन स्ट्रोक

अंतःस्राव संस्था.

तुमच्या शरीरातल्या ग्रंथी एड्रेनालाईन आणि कॉर्टिसॉल यांसारखे हॉर्मोन्स निर्माण करतात ज्यांमुळे तुमचं शरीर तणावाचा सामना करायला तयार होतं. तुमचं यकृत, रक्‍तातलं साखरेचं प्रमाण वाढवतं आणि यामुळे तुम्हाला जास्त ताकद मिळते. जास्त प्रमाणात असलेल्या तणावामुळे पुढे दिलेल्या गोष्टी होऊ शकतात.

  • डायबिटिज, रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होणं, सारखं आजारी पडणं, वागण्याबोलण्यात अचानक व वारंवार बदल होणं आणि वजन वाढणं

पचन संस्था.

तणावामुळे शरीराची पचन संस्था व्यवस्थितपणे काम करत नाही. जास्त प्रमाणात असलेल्या तणावामुळे पुढे दिलेल्या गोष्टी होऊ शकतात.

  • मळमळ, उलटी, जुलाब किंवा बद्धकोष्ठ होणं

प्रजनन संस्था.

तणावामुळे लैंगिक इच्छेवर आणि प्रजनन संस्थेच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. जास्त प्रमाणात असलेल्या तणावामुळे पुढे दिलेल्या गोष्टी होऊ शकतात.

  • अनियमित मासिक पाळी येणं आणि नपुंसकता येणं

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा