वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g20 क्र. १ पृ. ४
  • कोणत्या कारणांमुळे तणाव येतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कोणत्या कारणांमुळे तणाव येतो?
  • सावध राहा!—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • तणाव, चांगला आणि वाईट
    सावध राहा!—१९९८
  • तणाव म्हणजे काय?
    सावध राहा!—२०२०
  • तुम्ही तणावात आहात का?
    सावध राहा!—२०२०
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२०
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२०
g20 क्र. १ पृ. ४

तणाव कसा कमी कराल?

कोणत्या कारणांमुळे तणाव येतो?

एका प्रसिद्ध आरोग्य संस्थेचं म्हणणं आहे की “बऱ्‍याच लोकांमध्ये तणावाचं प्रमाण वाढत चालल्याचं दिसून येत आहे. आज लोकांच्या जीवनात सतत बदल घडत आहेत आणि पुढे काय होईल हे आपण निश्‍चितपणे सांगू शकत नाही.” जीवनात होणाऱ्‍या कोणत्या काही बदलांमुळे आणि अनिश्‍चित गोष्टींमुळे तणाव येऊ शकतो याबद्दल आता आपण पाहू या.

  • घटस्फोट

  • प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू

  • गंभीर आजार

  • भयंकर अपघात

  • गुन्हेगारी

  • धकाधकीचं जीवन

  • नैसर्गिक किंवा मानवांमुळे निर्माण झालेल्या विपत्ती

  • शाळेत किंवा कामावर येणारा दबाव

  • नोकरीबद्दल आणि आर्थिक सुरक्षेबद्दल चिंता

नोकरी गमावणं

अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या मते “नोकरी गेल्यामुळे एखाद्याचं जीवन उद्ध्‌वस्त होऊ शकतं. बेरोजगार कामगारांना आजारपणाचा, वैवाहिक जीवनात तणावाचा, नैराश्‍याचा आणि चिंतेचा सामना करावा लागू शकतो. तसंच त्यांना आत्महत्या करण्याची इच्छाही होऊ शकते. नोकरी गमावण्याचा परिणाम जीवनातल्या प्रत्येक पैलूवर होऊ शकतो.”

लहान वयात येणारा तणाव

आज लहान मुलांना तणाव येणं खूप सर्वसामान्य झालं आहे. काही मुलांना शाळेत इतर मुलं त्रास देतात किंवा घरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. इतर मुलांचं शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण केलं जातं. तसंच, बऱ्‍याच मुलांना परीक्षेची आणि चांगले मार्क मिळवण्याची चिंता असते. तर काहींना आईवडिलांच्या घटस्फोटामुळे दुःख सहन करावं लागतं. तणावात असलेल्या मुलांना भयानक स्वप्नं पडू शकतात, ती शिकण्यात मागे पडू शकतात, त्यांना नैराश्‍य येऊ शकतं किंवा ती एकलकोंडी बनू शकतात. काही मुलांना आपल्या भावनांवर ताबा मिळवणं कठीण जाऊ शकतं. मुलं जर तणावात असतील तर त्यांना लवकरात लवकर मदत करणं गरजेचं आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा