तुम्हाला आठवतं का?
या वर्षाचे टेहळणी बुरूज अंक तुम्ही लक्ष देऊन वाचले आहेत का? तर मग, पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात का ते पाहा:
आपण यहोवाचा महिमा का करतो?
कारण आपलं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि आपण मनापासून त्याचा आदर करतो. इतरांनीही त्याला ओळखावं असं आपल्याला वाटतं म्हणून आपण त्याचा महिमा करतो.—टेहळणी बुरूज२५.०१, पान ३.
जर एखाद्याने आपलं मन दुखावलं, तर आपण त्याला माफ कसं करू शकतो?
हे खरंय, की आपण आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही. पण आपण रागही धरून बसणार नाही. राग सोडून दिल्यामुळे आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल कडवटपणा राहणार नाही.—टेहळणी बुरूज२५.०२, पानं १५-१६.
मार्कने तरुणांसाठी एक चांगलं उदाहरण कसं मांडलं?
मार्कला सेवा करायची संधी मिळाली तेव्हा त्याने ती मनापासून स्वीकारली. तो परिस्थितीमुळे निराश झाला असला आणि दुखावला गेला असला तरी त्याने हार मानली नाही. त्याने पौलसोबतचं आणि इतर प्रौढ भावांसोबतचं त्याचं नातं मजबूत केलं.—टेहळणी बुरूज२५.०४, पान २७.
“मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय” असं येशूने प्रार्थनेत म्हटलं तेव्हा त्याचा काय अर्थ होता? (योहा. १७:२६)
त्याच्या शिष्यांना देवाचं नाव आधीपासूनच माहीत होतं. पण यहोवा कशा प्रकारचा देव आहे, त्याच्यात कोणकोणते गुण आहेत, त्याने पृथ्वी आणि मानवांना का बनवलं, त्याने कायकाय केलंय आणि तो भविष्यात काय करणार आहे हे येशूने त्यांना सांगितलं.—टेहळणी बुरूज२५.०५, पानं २०-२१.
मर्यादांची जाणीव असल्यामुळे आपण कोणती गोष्ट मान्य करू?
आपण मान्य करू की आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत. उदाहरणार्थ, अंत केव्हा येईल आणि त्यावेळी यहोवा नेमकं काय करेल हे आपल्याला माहीत नाही. तसंच उद्या काय होईल आणि यहोवा आपल्याला कितपत ओळखतो हेही आपल्याला माहीत नाही.—टेहळणी बुरूज२५.०६, पानं १५-१८.
आपल्याला एखाद्या लेखातून किंवा जाहीर भाषणातून पूर्ण फायदा कसा मिळवता येईल?
आपण स्वतःला काही प्रश्न विचारू शकता: ‘श्रोत्यांना याची खातरी पटावी यासाठी यात कोणते पुरावे वापरण्यात आलेत? यात असं एखादं उदाहरण वापरण्यात आलंय का, ज्याचा उपयोग मी एखाद्याला सत्याबद्दल शिकवण्यासाठी करू शकतो? या विषयात कोणाला आवड असेल? आणि याचा वापर मी कधी करू शकतो?’—टेहळणी बुरूज२५.०७, पान १९.
यहोवा दावीदशी जसा वागला त्यावरून आपण यहोवाच्या क्षमेबद्दल काय शिकू शकतो?
दावीदने त्याच्या जीवनात काही गंभीर चुका केल्या होत्या. पण तरीही त्याने मनापासून पश्चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याला माफ केलं. (१ राजे ९:४, ५) जेव्हा यहोवा माफ करतो तेव्हा तो आपल्या पापांचा हिशोब ठेवत नाही आणि परत ती कधी आठवतही नाही.—टेहळणी बुरूज२५.०८, पान १७.
जर बायबल विद्यार्थ्याला एखादी शिकवण समजून घेणं कठीण जात असेल, तर आपण काय करू शकतो?
जर त्याला एखादी शिकवण समजून घेणं कठीण जात असेल, तर त्यावरच रेंगाळत बसण्याऐवजी पुढच्या मुद्द्यावर जा आणि नंतर पुन्हा त्या मुद्द्यावर या/चर्चा करायची योजना करा.—टेहळणी बुरूज२५.०९, पान २४.
पापात आपल्याला फसवण्याची शक्ती आहे असं आपण का म्हणू शकतो? (इब्री ३:१३)
पापामुळे आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्याचा मोह तर होतोच, शिवाय आपण यहोवाच्या प्रेमावरसुद्धा शंका घेतो.—टेहळणी बुरूज२५.१०, पान १६.
आपल्याला मनमोकळेपणे प्रार्थना करायला कोणत्या तीन गोष्टींमुळे मदत होऊ शकते?
(१) यहोवाच्या गुणांचा विचार करा. (२) सध्या आपल्याला ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्याबद्दल प्रार्थना करा; जसं की, आपल्याला एखाद्याला माफ करणं कठीण जात असेल तर त्याबद्दल प्रार्थना करा. (३) प्रार्थना करायला पुरेसा वेळ द्या, म्हणजे तुम्हाला तुमचे विचार स्पष्टपणे यहोवाला सांगता येतील.—टेहळणी बुरूज२५.१०, पान १९-२०.
वयस्कर भाऊबहिणींना आपण कशी मदत करू शकतो?
नियमितपणे वयस्कर भाऊबहिणींना भेटा आणि फोन करा. त्यांच्यासोबत डॉक्टरकडे जा. तसंच, त्यांच्यासोबत प्रचार करा.—टेहळणी बुरूज२५.११, पान ६-७.
लग्नाची तयारी करताना ख्रिस्ती जोडप्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
लग्नाबद्दल असलेल्या सरकारी नियमांचं पालन करा. लग्नाच्या आणि रिसेप्शनच्या कार्यक्रमातून देवाच्या पवित्र शक्तीचे गुण दिसतील याची खातरी करा. तुमचा पेहराव शालीन असू द्या. बायबल तत्त्वांविरूद्ध असलेले रितीरिवाज पाळायचं टाळा. तसंच, लग्नाची तयारी करताना स्पष्टपणे आणि आदराने तुमचं मत मांडा.—टेहळणी बुरूज२५.१२, पान २१-२४.