वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 ऑगस्ट पृ. ३२
  • संबंधित वचनांच्या सूचीचा फायदा करून घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संबंधित वचनांच्या सूचीचा फायदा करून घ्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • मिळती जुळती माहिती
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • JW.ORG वर दररोजच्या जीवनासाठी उपयोगी असलेलं मार्गदर्शन शोधा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • वेबसाईट वापरण्याबद्दल एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 ऑगस्ट पृ. ३२

अभ्यासासाठी टीप

संबंधित वचनांच्या सूचीचा फायदा करून घ्या

पवित्र शास्त्र नवे जग भाषांतराचं एक वैशिष्ट्य म्हणजे संबंधित वचनांची सूची किंवा मार्जिनल रेफरेन्स. हे बायबल वाचत असताना तुम्हाला काही वचनांपुढे अंक दिसतील. ही अंक तुम्ही छापील आवृत्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला शोधलीत, तर तुम्हाला त्यापुढे संबंधित वचनांची सूची दिसेल. JW लायब्ररी ॲपवर किंवा jw.org वर असलेल्या बायबलमध्ये जर तुम्ही अंकांवर क्लिक केलं, तर तुम्हाला ही सूची दिसेल. या सूचीमधल्या वचनांमुळे बायबलचे वेगवेगळे भाग एकमेकांशी कसे संबंधित आहेत हे कळतं. आणि आपल्याला अमुक एका विषयाबद्दल आणखी माहिती मिळते.

संबंधित वचनांच्या सूचीत खाली दिलेल्या गोष्टींबद्दलची आणि आणखी इतर गोष्टींबद्दलची वचनं असतील:

एकसारखे अहवाल: या वचनांत तुम्हाला बायबलच्या दुसऱ्‍या पुस्तकातली तीच घटना वाचायला मिळेल. जसं की, २ शमुवेल २४:१ आणि १ इतिहास २१:१ पाहा.

सारखे शब्द: या वचनांतून तुम्हाला अमुक एक वाक्यांश किंवा शब्द कुठून आला हे कळतं. जसं की, मत्तय ४:४ आणि अनुवाद ८:३ पाहा.

पूर्ण झालेली भविष्यवाणी: या वचनांतून भविष्यवाणी किंवा मग तिची पूर्णता कळते. जसं की, मत्तय २१:५ आणि जखऱ्‍या ९:९ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा