वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp21 क्र. ३ पृ. १५
  • तुम्ही तुमचं भविष्य निवडू शकता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही तुमचं भविष्य निवडू शकता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण यहोवावर प्रेम कसं करू शकतो आणि त्याचं कसं ऐकू शकतो?
  • तुमचं भविष्य, तुमची निवड!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • तुम्ही देवाशी जवळचं नातं जोडू शकता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • थोडक्यात परिचय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
wp21 क्र. ३ पृ. १५
कॅफेमध्ये बसलेला एक मुलगा दुसऱ्‍याला आपल्या फोनवर काहीतरी दाखवत आहे.

तुम्ही तुमचं भविष्य निवडू शकता

एक चांगलं भविष्य मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे यहोवा देवाने जवळपास ३,५०० वर्षांपूर्वी आपल्या उपासकांना सांगितलं होतं. त्याने म्हटलं: “मी तुमच्यासमोर जीवन आणि मृत्यू, तसंच, आशीर्वाद आणि शाप ठेवत आहे. तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी जीवन निवडावं, म्हणजे तुम्ही जगाल.”​—अनुवाद ३०:१९.

चांगलं भविष्य मिळवण्यासाठी त्या लोकांना योग्य निवड करायची होती. आज आपल्यासमोरही तेच पर्याय आहेत. चांगल्या भविष्याची निवड कशी करता येईल ते बायबलमध्ये सांगितलं आहे: “तुमचा देव यहोवा याच्यावर प्रेम करा, त्याचं ऐका.”​—अनुवाद ३०:२०.

आपण यहोवावर प्रेम कसं करू शकतो आणि त्याचं कसं ऐकू शकतो?

बायबलमधून शिका: यहोवावर प्रेम करण्यासाठी तुम्ही आधी बायबलमधून त्याच्याबद्दल शिकलं पाहिजे. जसंजसं तुम्ही शिकाल तसंतसं तुम्हाला दिसून येईल, की यहोवा एक प्रेमळ देव आहे आणि तुमचं भलं व्हावं अशी त्याची इच्छा आहे. “त्याला तुमची काळजी आहे,” म्हणून तो तुम्हाला त्याला प्रार्थना करायचं प्रोत्साहन देतो. (१ पेत्र ५:७) बायबल असं वचन देतं, की तुम्ही जर त्याला जवळून ओळखण्याचा प्रयत्न केला, तर “तो तुमच्या जवळ येईल.”​—याकोब ४:८.

शिकलेल्या गोष्टी लागू करा: देवाचं ऐकणं म्हणजे त्याने बायबलमध्ये दिलेल्या त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागणं. बायबल म्हणतं: “असं केलंस तर तू यशस्वी होशील आणि सुज्ञपणे वागशील.”​—यहोशवा १:८.

याबद्दल आणखी शिकून घेण्यासाठी jw.org/mr या आमच्या वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्ही ऑनलाईन बायबल वाचू शकता, बायबलबद्दलच्या प्रश्‍नांची उत्तरं मिळवू शकता आणि विनामूल्य बायबल अभ्यासासाठी विनंती करू शकता.

एका चांगल्या भविष्यासाठी आत्ताच बायबलचं मार्गदर्शन स्वीकारण्याची निवड करा!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा