ख्रिस्ती जीवन
तुमच्याजवळ आहे “त्यात समाधानी राहा”
आपली आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल तर आपण असं काहीतरी करायच्या मोहात पडू शकतो, ज्यामुळे यहोवासोबतचं आपलं नातं कमजोर होईल. उदाहरणार्थ, आपल्याला कदाचित भरपूर पैसे कमवायची संधी मिळेल. पण त्यामुळे आध्यात्मिक गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होईल. पण इब्री लोकांना १३:५ या वचनावर मनन केल्यामुळे आपल्याला मदत होऊ शकते.
“आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्त ठेवा”
पैशाबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा आहे याचं प्रार्थनापूर्वक परीक्षण करा. तसंच, तुमच्या मुलांसमोर तुम्ही कशा प्रकारचं उदाहरण ठेवत आहात याचाही विचार करा.—सावध राहा! १०/१५ ६.
“आहे त्यात समाधानी राहा”
जर तुमच्या इच्छा, तुमच्या गरजा बनत असतील तर तुमचा दृष्टिकोन बदला.—टेहळणी बुरूज१६.०७ ७ ¶१-२.
“मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही”
तुम्ही देवाच्या राज्याला जीवनात पहिलं स्थान देत राहिलात तर यहोवा तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमची मदत करेल अशी खातरी ठेवा.—टेहळणी बुरूज१४ ४/१५ २१ ¶१७.
आपले भाऊबहीण शांतीने कसे राहत आहेत?—आर्थिक अडचणी असतानाही हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या:
भाऊ मिग्वेल यांच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?