वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. ९
  • तुमच्या बायबल विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायला मदत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या बायबल विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायला मदत करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • यहोवासोबत जवळचं नातं जोडायला तुमच्या बायबल विद्यार्थ्याला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • आपल्या बायबल विद्यार्थ्याला वाईट संगतीपासून दूर राहायला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • वाईट सवयी सोडायला तुमच्या विद्यार्थ्याला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. ९

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायचं प्रोत्साहन द्या

मंडळीच्या सभा आपल्या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. (स्तो २२:२२) यहोवाची उपासना करण्यासाठी जे सभांना उपस्थित राहतात त्यांना आनंद मिळतो आणि बरेच आशीर्वाद अनुभवता येतात. (स्तो ६५:४) सभांना नियमितपणे उपस्थित राहिल्यामुळे बायबल विद्यार्थी लवकर प्रगती करू शकतो.

सभेला उपस्थित राहण्यासाठी तुम्ही बायबल विद्यार्थ्याला कशी मदत करू शकता? त्यांना सभेला यायचं प्रोत्साहन देत राहा. यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?  हा व्हिडिओ त्यांना दाखवा. त्यांना सभेला आल्यामुळे होणाऱ्‍या फायद्यांबद्दल सांगा. (कायम आनंद घ्या! धडा १०) सभेत शिकलेल्या गोष्टी त्यांना सांगा किंवा पुढच्या सभेत आपण काय-काय शिकणार आहोत याबद्दल थोडी माहिती द्या. सभेत ज्या प्रकाशनांवर चर्चा केली जाईल ती प्रकाशनं त्यांना द्या. तसंच, त्यांना सभांना यायला मदत करा. कदाचित तुम्ही तुमच्या गाडीतून त्यांना सभांना घेऊन येऊ शकता. विद्यार्थ्याने पहिल्यांदा सभेला येण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घेता, तिचे तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील.—१कर १४:२४, २५.

तुमच्या बायबल विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायला मदत करा, हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा:

  • “तुमच्या बायबल विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायला मदत करा” या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की, निता जेडला सभांना बोलवते.

    जेडला सभेला बोलवण्यासाठी निताने मिळालेल्या संधीचा कसा उपयोग केला?

  • “तुमच्या बायबल विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायला मदत करा” या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की, जेड सभेला येते आणि निताच्या बाजूला बसते हे पाहून निताला आनंद होतो.

    बायबल विद्यार्थी सभेला येतो तेव्हा आपल्याला आनंद का होतो?

  • “तुमच्या बायबल विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायला मदत करा” या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की, सभेनंतर एक बहीण जेडला भेटते आणि तिच्याशी प्रेमाने बोलते.

    “देव खरंच तुमच्यामध्ये आहे”

    जेड पहिल्यांदा सेभेला आली तेव्हा तिने काय अनुभवलं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा