ख्रिस्ती जीवन
सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला जाण्याची तुमची इच्छा आहे का?
तुमचं वय २३ ते ६५ यामध्ये आहे का? तुम्ही पूर्णवेळेची सेवा करत आहात का? तुमची तब्येत चांगली आहे का? आणि प्रचारकांची जास्त गरज असलेल्या भागात जाऊन सेवा करणं तुम्हाला शक्य आहे का? तुमचं उत्तर हो असेल, तर तुम्ही सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला जाण्याचा विचार केला आहे का? या प्रशालेचा पहिला क्लास झाला तेव्हापासून हजारो जोडप्यांनी, अविवाहित बांधवांनी आणि अविवाहित बहिणींनी या प्रशालेसाठी अर्ज भरला आहे. खरंतर अविवाहित बांधव जास्त सेवा करू शकतात, त्यामुळे जास्तीत जास्त बांधवांनी या प्रशालेसाठी अर्ज भरावा, अशी आमची इच्छा आहे. यहोवाला आनंदी करण्याची आणि त्याच्या मुलाचं अनुकरण करण्याची तुमची इच्छा वाढावी, अशी यहोवाला प्रार्थना करा. (स्तो ४०:८; मत्त २०:२८; इब्री १०:७) मग तुम्हाला अर्ज करता यावा म्हणून नोकरीधंदा आणि वैयक्तिक जबाबदारी यांच्या बाबतीत तुम्हाला काही बदल करता येतील का याचा विचार करा.
या प्रशालेतून प्रशिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर सेवा करण्याचे कोणकोणते मार्ग मोकळे झाले आहेत? काही विद्यार्थ्यांना दुसरी भाषा बोलणाऱ्या क्षेत्रात पाठवण्यात आलं आहे, तर काहींना महानगरातलं खास सार्वजनिक साक्षकार्य करण्यासाठी नेमण्यात आलं आहे. काही विद्यार्थ्यांना पर्यायी विभागीय पर्यवेक्षक, विभागीय पर्यवेक्षक किंवा मिशनरी सेवेसाठी नियुक्त केलं आहे. यहोवाची सेवा करण्याच्या या सर्व संधीचा विचार करताना तुमच्याही भावना यशया संदेष्ट्यासारख्याच असू द्या. त्याने म्हटलं: “मी जाईन! मला पाठव!”—यश ६:८.
मिशनरी—कापणीचं काम करणारे कामकरी हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
मिशनरी कसे निवडले जातात?
मिशनरी कोणतं चांगलं काम करत आहेत?
मिशनरी सेवा केल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतात?