देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय १६-१७
प्रायश्चित्ताच्या दिवसापासून आपण काय शिकू शकतो?
प्रायश्चित्ताच्या दिवशी धूपाचा ज्या प्रकारे वापर केला जायचा त्यापासून आपण काय शिकू शकतो?
यहोवाच्या विश्वासू सेवकांच्या प्रार्थना त्याच्यासाठी धूपाप्रमाणे आहेत. (स्तो १४१:२) महायाजक ज्या प्रकारे मोठ्या आदराने यहोवासमोर धूप आणायचा त्याच प्रकारे आपणही आदराने यहोवाला प्रार्थना केली पाहिजे
महायाजकाने बलिदान अर्पण करण्याआधी धूप जाळणं गरजेचं होतं. त्याच प्रकारे, येशूलाही जीवन अपर्ण करण्याआधी, यहोवाने त्याचं बलिदान स्वीकारावं म्हणून आयुष्यभर यहोवाला एकनिष्ठ राहणं गरजेचं होतं
मी देत असलेली बलिदानं यहोवाने स्वीकारावीत म्हणून मी काय केलं पाहिजे?