देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम २९-३०
यहोवासाठी देणगी
निवासमंडप बनवण्यात आला, तेव्हा प्रत्येक इस्राएली व्यक्तीला पैशांची देणगी देऊन यहोवाच्या उपासनेला हातभार लावण्याची संधी होती. ही संधी श्रीमंत आणि गरीब अशा सर्वच लोकांना होती. आज आपण कशा प्रकारे यहोवासाठी देणगी देऊ शकतो? याचा एक मार्ग म्हणजे राज्य सभागृहं, संमेलनगृहं, भाषांतर कार्यालयं आणि बेथेल इमारती, तसंच यहोवाच्या उपासनेसाठी समर्पित असलेल्या इतर इमारतींसाठी आर्थिक देणग्या देणं.
खऱ्या उपासनेला हातभार लावण्यासाठी पैशांची देणगी देण्याबद्दल आपण पुढे दिलेल्या वचनांतून काय शिकू शकतो?