वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 सप्टेंबर पृ. ७
  • तुम्ही आपला वेळ आणि शक्‍ती खर्च करायला तयार आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही आपला वेळ आणि शक्‍ती खर्च करायला तयार आहात का?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या उपासनेशी संबंधित बांधकाम प्रकल्पांत मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • राज्य सभागृह बांधकाम —पवित्र सेवेचा महत्त्वपूर्ण पैलू
    आमची राज्य सेवा—२००६
  • राज्य सभागृह बांधकामाची गरज पूर्ण करणे
    आमची राज्य सेवा—१९९७
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्रिस्ती बंधूसमाजाची सेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 सप्टेंबर पृ. ७

ख्रिस्ती जीवन

तुम्ही आपला वेळ आणि शक्‍ती खर्च करायला तयार आहात का?

बांधकाम प्रकल्पात पाईप कापणाऱ्‍या एका बांधवाच्या चेहऱ्‍यावर स्माईल आहे.

यशयाने भविष्यवाणी केल्याप्रमाणे, यहोवाच्या संघटनेच्या पृथ्वीवर असलेल्या भागात आज खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. (यश ५४:२) यामुळे, नवीन राज्य सभागृहं, संमेलनगृहं आणि शाखा कार्यालयांचं बांधकाम करण्याची गरज निर्माण झाली आहे. या इमारतींचं बांधकाम झाल्यानंतर, अधूनमधून त्यांची डागडुजी करावी लागू शकते आणि काही इमारतींचं पुढे नविनीकरण करावं लागतं. मग यहोवाच्या या कामासाठी आपला वेळ आणि शक्‍ती खर्च करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या संधी आहेत?

  • आपल्या क्षेत्र सेवेच्या गटाला राज्य सभागृहाची स्वच्छता करायला नेमलं जातं, तेव्हा आपण त्यात सहभाग घेऊ शकतो

  • आपल्या राज्य सभागृहाच्या मेंटेनन्सचं प्रशिक्षण घेण्यासाठी आपण आपलं नाव देऊ शकतो

  • आसपासच्या ठिकाणी होत असलेल्या बांधकामाच्या किंवा मेंटेनन्सच्या प्रोजेक्ट्‌समध्ये अधूनमधून सहभागी होण्यासाठी, आपण लोकल डिझाईन/​कंस्ट्रक्शन वॉलंटियर ॲप्लिकेशन  (DC-५०) हा फॉर्म भरू शकतो

  • आपल्या शाखेच्या क्षेत्रात असलेल्या बेथेलमध्ये किंवा दुसऱ्‍या एखाद्या शाखा कार्यालयात एका आठवड्यासाठी किंवा त्यापेक्षा जास्त काळ सेवा करण्यासाठी, आपण ॲप्लिकेशन फॉर वॉलंटियर प्रोग्रॅम  (A-१९) हा फॉर्म भरू शकतो

एका नवीन बांधकाम प्रकल्पाची योजना आखली जात आहे—निवडक भाग  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • २०१४ पासून व्हिडिओंच्या वापरात कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे?

  • व्हिडिओंच्या निर्मितीची वाढती गरज लक्षात घेऊन, कोणत्या प्रकल्पाची योजना आखली जात आहे आणि हे बांधकाम कधीपर्यंत चालेल?

  • स्वयंसेवक या प्रकल्पात कशी मदत करू शकतात?

  • आपल्याला रामापो इथल्या बांधकामात हातभार लावायची इच्छा असेल, तर आपण (DC-५०) हा फॉर्म भरून जवळपासच्या ठिकाणी स्थानिक डिझाईन/​बांधकाम प्रकल्पांत का सहभाग घेतला पाहिजे?

  • या प्रकल्पाला यहोवा मार्गदर्शित करत आहे याचा काय पुरावा आहे?

  • आपल्याला जरी या प्रकल्पात सहभागी होता आलं नाही, तरी आपण कशा प्रकारे त्याला हातभार लावू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा