देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ती १५-१७
देवाने अब्राम आणि साराय यांची नावं का बदलली?
यहोवाच्या नजरेत अब्राम सात्विक आणि निर्दोष होता. जेव्हा त्याने अब्रामला भविष्याबद्दल अभिवचन दिलं, तेव्हा त्याने अब्राम आणि सारा यांची नावं बदलून त्यांना भविष्यसूचक अर्थ असलेली नावं दिली.
या बदललेल्या नावांप्रमाणे अब्राहाम पुष्कळ राष्ट्रांचा पिता आणि सारा राजांची पूर्वज बनली.
अब्राहाम
पुष्कळ राष्ट्रांचा पिता
सारा
राणी
जन्माच्या वेळी आपल्याला कोणतं नाव दिलं जाईल हे आपण ठरवू शकत नाही. पण अब्राहाम आणि सारा यांच्यासारखं आपण एक चांगलं नाव नक्कीच कमवू शकतो. म्हणून स्वतःला विचारा:
‘यहोवाच्या नजरेत सात्विक बनण्यासाठी मी काय करू शकतो?’
‘यहोवाच्या नजरेत मी कशा प्रकारची व्यक्ती आहे?’