देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ पेत्र ३-५
“सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे”
जगाने आजपर्यंत पाहिलं नसेल इतकं मोठं आणि भयंकर संकट आपण लवकरच पाहणार आहोत. तर मग, आता आणि भविष्यातही आपण आपला विश्वास कशा प्रकारे मजबूत ठेवू शकतो?
यहोवाला वारंवार सर्व प्रकारच्या प्रार्थना करत राहा
आपल्या भाऊबहिणींसोबत आपलं नातं आणखी मजबूत करण्याद्वारे त्यांच्याबद्दल गाढ प्रेम विकसित करा
मनापासून पाहुणचार करा
स्वतःला विचारा: ‘कोणत्या काही व्यावहारिक मार्गांनी मी सोबत असणाऱ्या आणि जगभरातल्या माझ्या भाऊ-बहिणींना गाढ प्रेम दाखवू शकतो आणि त्यांचा पाहुणचार करू शकतो?’