ख्रिस्ती जीवन
शुद्ध आचरण आणि मनापासून दाखवलेला आदर मन जिंकतो
सत्यात असलेल्या आपल्या बऱ्याच बहिणींनी ख्रिस्तासारखं आचरण दाखवून आपल्या पतींनाही सत्यात आणलं आहे. पण त्यासाठी त्यांना कदाचित बरीच वर्षं समस्यांचा सामना करावा लागला असेल. (१पेत्र २:२१-२३; ३:१, २) जर तुम्हीही अशा परिस्थितींचा सामना करत असाल तर मग तुम्हीसुद्धा बऱ्याने वाइटाला जिंकण्याचा प्रयत्न सोडू नका. (रोम १२:२१) कदाचित तुमच्या चांगल्या उदाहरणाचा तुमच्या जोडीदारवर असा परिणाम होईल, की जो फक्त शब्दांनी होणं शक्य नाही.
एखाद्या विषयाबद्दल तुमच्या जोडीदाराला काय वाटतं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. (फिलि २:३, ४) त्याच्या परिस्थितीला समजून घ्या आणि त्याच्याशी सौम्यतेने वागा. आणि त्याला आदर दाखवत आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडा. त्याचं ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. (याक १:१९) धीर दाखवा आणि तुमचं तुमच्या पतीवर प्रेम आहे याची त्याला जाणीव करून द्या. जरी तुमच्या पतीने तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि आदराबद्दल म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही, तरी तुम्ही दाखवलेल्या विश्वासूपणाची यहोवा कदर करतो याची खात्री बाळगा.—१पेत्र २:१९, २०.
आपला भार उचलण्यासाठी यहोवा आपल्याला बळ देतो हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
सिस्टर ग्रेस ली यांच्या लग्नानंतरचा सुरूवातीचा काळ कसा होता?
कोणत्या गोष्टीमुळे त्यांना बायबलचं सत्य जाणून घ्यावंसं वाटलं?
बाप्तिस्म्यानंतर येणाऱ्या समस्यांमध्ये तग धरून राहण्यासाठी त्यांना कशामुळे मदत झाली?
सिस्टर ली यांनी आपल्या पतीसाठी काय प्रार्थना केली होती?
शुद्ध आचरण आणि मनापासून दाखवलेल्या आदरामुळे सिस्टर ली यांना कोणते आशीर्वाद मिळाले?
शुद्ध आचरण आणि मनापासून दाखवलेला आदर चांगला परिणाम घडवून आणू शकतो!