वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 ऑगस्ट पृ. ८
  • कधीही विसरली जाणार नाहीत अशी चांगली कार्यं!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कधीही विसरली जाणार नाहीत अशी चांगली कार्यं!
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—२००३
  • बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्‍यकता
    आमची राज्य सेवा—१९९५
  • ‘देवाच्या घराकडे’ गुणग्राहकतेने पाहणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 ऑगस्ट पृ. ८
एक बहीण बेथेलच्या किचनमध्ये काम करत असताना

ख्रिस्ती जीवन

कधीही विसरली जाणार नाहीत अशी चांगली कार्यं!

देवाच्या पवित्र सेवेत चांगली कामं करण्याद्वारे, आपण सर्व जण एक चांगलं नाव कमावू शकतो. ज्याप्रमाणे मुलांनी केलेल्या चांगल्या गोष्टी प्रेमळ आईवडील कधीही विसरत नाहीत, त्याचप्रमाणे यहोवाच्या नावासाठी आपण दाखवलेलं प्रेम आणि केलेली कार्यं तोही कधी विसरत नाही. (मत्त ६:२०; इब्री ६:१०) हे खरं आहे, की आपल्या क्षमता आणि परिस्थिती वेगवेगळया असू शकतात, पण तरीही जेव्हा यहोवाच्या सेवेत आपण होताहोईल तितकं करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्यालाही खूप आनंद होतो. (गल ६:४; कल ३:२३) अनेक वर्षांपासून हजारो बंधुभगिनी बेथेल सेवेत कार्य करत आहेत. तुम्हालाही बेथेलमध्ये सेवा करणं शक्य आहे का? जर नसेल, तर तुम्ही इतरांना बेथेल सेवेसाठी प्रोत्साहन देऊ शकता का? किंवा बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या एका बांधवाला किंवा बहिणीला या खास सेवेत टिकून राहण्यासाठी मदत करू शकता का?

तुम्ही बेथेल सेवेसाठी तयार आहात का? हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • बेथेल सेवा करण्यामागचा हेतू काय असला पाहिजे?

  • बेथेलमध्ये सेवा केलेल्या काही बंधुभगिनींच्या काय भावना आहेत?

  • बेथेल सेवेसाठी कोणत्या पात्रता असणं गरजेचं आहे?

  • बेथेल सेवेसाठी अर्ज करण्याकरता तुम्ही काय करू शकता?

तीन बेथल सदस्य कंप्युटर समोर बसून एका प्रोजेक्टवर काम करत आहेत; एक बांधव बॉक्समध्ये साहित्य ठेवत आहे; एक बांधव बेथेलमध्ये सुतारकाम करत आहे

बेथेल सेवेसाठी लागणाऱ्‍या पात्रता

  • यहोवा आणि त्याच्या संघटनेसाठी गाढ प्रेम

  • उच्च नैतिक दर्जे आणि यहोवासमोर शुद्ध विवेक

  • ख्रिस्ती व्यक्‍तीला शोभेल असा पेहराव आणि केशभूषा

  • ख्रिश्‍चनांसाठी योग्य असलेल्या मनोरंजनाची निवड

  • वय साधारण १९ ते ३५ दरम्यान

  • चांगलं मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य

  • शाखा कार्यालयाच्या भाषेत बोलता, लिहिता आणि वाचता येणं

  • किमान १ वर्ष बेथेलमध्ये राहण्याची तयारी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा