देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | इब्री लोकांना ४–६
देवाच्या विसाव्यात जाण्याचा होईल तितका प्रयत्न करा
यहोवाने त्याचा उद्देश त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला कळवला आहे. या उद्देशानुसार जेव्हा आपण वागतो तेव्हा आपण त्याच्या विसाव्यात जाऊ शकतो. म्हणून आपण स्वतःला विचारलं पाहिजे: ‘माझी चूक सुधारली जाते तेव्हा माझी प्रतिक्रिया कशी असते? संघटनेद्वारे वचनांबद्दल सुधारित समज दिली जाते तेव्हा माझी प्रतिक्रिया कशी असते?’
अशा कोणत्या परिस्थिती माझ्यासमोर येऊ शकतात ज्यामध्ये माझ्या आज्ञाधारकतेची परीक्षा होईल?