वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 ऑगस्ट पृ. ३
  • यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांसोबत वेळ घालवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांसोबत वेळ घालवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • वाईट संगतीमुळे यहोआशने यहोवाला सोडले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • त्याने राजघराण्याच्या वारसदाराचं संरक्षण केलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • आपण यहोवाची भीती का बाळगली पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • धाडस दाखवणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वाद देतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 ऑगस्ट पृ. ३

ख्रिस्ती जीवन

यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांसोबत वेळ घालवा

यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांसोबत आपण वेळ का घालवला पाहिजे? कारण आपण ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांचा आपल्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. (नीत १३:२०) उदाहरणार्थ, राजा योवाश जोपर्यंत महायाजक यहोयादासोबत होता, तोपर्यंत त्याने “परमेश्‍वराच्या दृष्टीने जे नीट” ते केलं. (२इत २४:२) पण यहोयादाच्या मृत्यूनंतर, वाईट संगतीमुळे योवाश राजा यहोवापासून दूर गेला.—२इत २४:१७-१९.

पहिल्या शतकात, पौलने ख्रिस्ती मंडळीची तुलना एका ‘मोठ्या घरासोबत’ केली आणि मंडळीतल्या सदस्यांची तुलना घरात वापरल्या जाणाऱ्‍या ‘भांड्यांशी’ केली. जेव्हा आपण यहोवाला नाराज करणाऱ्‍या लोकांसोबत संगत करायचं टाळतो तेव्हा आपण “आदरणीय कामासाठी असलेल्या भांड्यासारखं” ठरत असतो. मग त्या लोकांमध्ये आपल्या कुटुंबातले किंवा मंडळीतले सदस्यसुद्धा असतील. (२ती २:२०, २१) तर मग, आपण नेहमी यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांसोबत आणि त्याची सेवा करत राहण्याचं प्रोत्साहन देणाऱ्‍यांसोबत मैत्री करू या.

वाईट संगत टाळायला शिका हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • वाईट संगतीचा आपल्यावर कोणकोणत्या मार्गांनी परिणाम होऊ शकतो?

  • व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले दोन बांधव आणि एक बहीण कशामुळे वाईट संगत टाळू शकले?

  • समंजसपणे मित्र निवडण्यासाठी बायबलची कोणती तत्त्वं तुम्हाला मदत करतील?

जॉन हॉटेलमध्ये त्याला भेटायला आलेल्या लोकांसाठी ग्लासमध्ये वाईन भरत आहे; क्रिस्टीन सोशल मिडीयाचा वापर करत आहे; जेडन ऑनलाईन गेम खेळत आहे; जॉन व त्याचं कुटुंब, क्रिस्टीन आणि जेडन मंडळीच्या सभेत असताना

“आदरणीय कामासाठी असलेल्या भांड्यासारखा” मी आहे का?—२ती २:२१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा