ख्रिस्ती जीवन
कॅरिबियनमधल्या ख्रिस्ती बंधुभगिनींच्या साहाय्यासाठी करण्यात आलेलं मदतकार्य
पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती बंधुभगिनींनी संकटात अडकलेल्या आपल्या बांधवांना मदत करण्याद्वारे ख्रिस्ती प्रेम दाखवलं. आज हा बहुमान आपल्या हातातही आहे. (योह १३:३४, ३५) कॅरिबियनमध्ये राहत असलेल्या आपल्या गरजू बंधुभगिनींना इतर बांधवांनी कशी मदत केली हे पाहण्यासाठी, ख्रिस्ती प्रेमाचा पुरावा—कॅरिबियन बेटांवरचं मदतकार्य हा व्हिडिओ दाखवा, आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
एर्मा आणि मरीया नावाच्या चक्रीवादळांमुळे कॅरिबियनमधल्या आपल्या बांधवांचं कशा प्रकारे नुकसान झालं?
कॅरिबियनमधल्या बांधवांना यहोवाने इतर बांधवांद्वारे कशा प्रकारे मदत पुरवली?
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या बंधुभगिनींवर बांधवांनी दाखवलेल्या उदारतेचा आणि प्रेमाचा कसा परिणाम झाला?
कॅरिबियनमधल्या मदतकार्यात किती बांधवांनी आणि बहिणींनी सहभाग घेतला?
आपणही सर्व जण कशा प्रकारे मदतकार्यात सहभाग घेऊ शकतो?
हा व्हिडिओ पाहिल्यावर, या उदार आणि प्रेमळ संघटनेचा भाग असल्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं?