वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 फेब्रुवारी पृ. ८
  • धीर दाखवत आतुरतेनं वाट पाहत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धीर दाखवत आतुरतेनं वाट पाहत राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • धीर—ख्रिश्‍चनांसाठी आवश्‍यक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • धीर धरणाऱ्‍यास प्रतिफळ मिळेल
    आमची राज्य सेवा—२००४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 फेब्रुवारी पृ. ८

ख्रिस्ती जीवन

धीर दाखवत आतुरतेनं वाट पाहत राहा

तुम्ही किती वर्षांपासून देवाच्या राज्याची वाट पाहत आहात? कठीण परिस्थितीतून जात असताना तुम्ही धीर न सोडता तग धरून आहात का? (रोम ८:२५) कारण आपल्या काही बंधुभगिनींनी त्यासाठी द्वेष, वाईट वागणूक, तुरुंगवास एवढंच नव्हे तर मृत्यूचा धोकाही पत्करला आहे. आणि असेही काहीजण आहेत जे गंभीर आजारपण आणि वाढतं वय यांसारख्या कठीण परिस्थितींना तोंड देत आहेत.

मग अशा कठीण परिस्थितींचा सामना करत असताना धीरानं वाट पाहत राहण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? यासाठी आपण दररोज बायबलचं वाचन करून त्यावर खोलवर विचार केला पाहिजे आणि त्याद्वारे आपल्या विश्‍वासाला आणखी मजबूत करत राहिलं पाहिजे. काहीही झालं तरी आपण आपली आशा आपल्या नजरेआड कधीच होऊ देता कामा नये. (२कर ४:१६-१८; इब्री १२:२) यासोबतच, यहोवाला प्रार्थना करून आपण त्याच्या पवित्र आत्म्यासाठी अक्षरशः भीक मागितली पाहिजे. (लूक ११:१०, १३; इब्री ५:७) म्हणजे मग “सहनशक्‍ती दाखवून आनंदाने धीर” धरता यावा म्हणून आपला प्रेमळ पिता आपल्याला मदत करेल​—कल १:११.

जीवनाच्या “शर्यतीत धीराने” धावण्याची गरज आहे​—बक्षीस मिळेल याची खातरी बाळगा  असं शीर्षक असलेला व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • जॅमी आणि त्यांच्या पत्नी प्रचारकार्यात असताना

    आपल्या जीवनात कोणत्या काही अनपेक्षित गोष्टी घडू शकतात? (उप ९:११)

  • जॅमी यांना स्ट्रोक आल्यावर, बंधू कार्ल त्यांना वचन दाखवताना

    संकटांचा सामना करत असताना प्रार्थना केल्यामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

  • जॅमी आणि कार्ल एका जोडप्याची मेंढपाळ भेट घेताना

    यहोवाच्या सेवेत पूर्वीइतकं करता येत नसलं, तरी सध्या जितकं करता येईल तितकं करत राहणं का महत्त्वाचं आहे?

  • जॅमी नंदनवनात पुन्हा बरं झाल्याची कल्पना करताना

    आपलं लक्ष बक्षिसावर केंद्रित करा

    आपल्याला बक्षीस मिळेलच अशी खात्री आपण कोणत्या गोष्टीमुळे बाळगू शकतो?

आज जे संकटांचा सामना करत आहेत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता?

  • त्यांना धीर मिळेल असं बोला आणि इतरांसोबत त्यांची तुलना करू नका

  • त्यांचं म्हणणं लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा

  • त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत प्रार्थना करा

  • एखाद्या वेळी त्यांच्यासाठी जेवण बनवा किंवा त्यांच्या घरकामात त्यांना मदत करा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा