देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान ११-१२
येशूने दाखवलेल्या दयेचं अनुकरण करा
येशूने दाखवलेली दया आणि सहानुभूती इतकी उल्लेखनीय का होती?
इतरांना सहन कराव्या लागत असलेल्या परिस्थितींचा येशूने जरी सामना केला नसला, तरी त्याने स्वतःला त्यांच्या जागी ठेवून त्यांच्या वेदना अनुभवल्या
सर्वांसमोर भावना व्यक्त करायला तो कचरला नाही
इतरांना मदत करण्यात त्याने पुढाकार घेतला