देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान ९-१०
येशू आपल्या मेंढरांची काळजी घेतो
एका मेंढपाळाचं आणि त्याच्या मेंढरांचं नातं माहितीवर व भरवशावर आधारित असतं. येशू चांगला मेंढपाळ आहे. तो त्याच्या प्रत्येक मेंढराच्या गरजा, कमतरता व क्षमता जाणतो. तसंच, मेंढरंही आपल्या मेंढपाळाला ओळखतात आणि त्याच्या नेतृत्वावर भरवसा ठेवतात.
येशू पुढील बाबतीत एक चांगला मेंढपाळ कसा आहे?
मेंढरांना एकत्रित करण्याबाबतीत
मेंढरांचं मार्गदर्शन करण्याबाबतीत
मेंढरांना सुरक्षित ठेवण्याबाबतीत
मेंढरांना आध्यात्मिक अन्न पुरवण्याबाबतीत