देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | सफन्या १-हाग्गय २
यहोवाच्या क्रोधाचा दिवस येण्याआधी त्याचा शोध घ्या
यहोवा आपल्या क्रोधाच्या दिवशी त्याच्या सेवकांचा बचाव करेल. पण त्यांच्यापैकी एक असण्यासाठी आपल्याला फक्त आपलं जीवन समर्पित करणं पुरेसं नाही. तर सफन्याने इस्राएली लोकांना जे मार्गदर्शन दिलं होतं, त्याचं पालन करणंही गरजेचं आहे.
यहोवाचा शोध घ्या: यहोवाच्या संघटनेत राहून त्याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवा
धार्मिकतेचा शोध घ्या: यहोवाच्या धार्मिक किंवा नीतिमान स्तरांनुसार जगा
नम्रतेचा शोध घ्या: नम्रपणे देवाच्या अधीन राहा आणि त्याच्याकडून मिळणारा सुधारणुकीचा सल्ला स्वीकारा
मी यहोवाचा, धार्मिकतेचा आणि नम्रतेचा आणखीन चांगल्या प्रकारे शोध कसा घेऊ शकतो?