देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | ओबद्या १–योना ४
आपल्या चुकांमधून शिका
योनाच्या अहवालातून आपल्याला समजतं, की आपण जेव्हा चुका करतो तेव्हा यहोवा आपल्याविषयी आशा सोडत नाही. असं असलं तरी, आपण आपल्या चुकांमधून शिकावं आणि आवश्यक ते फेरबदल करावेत, अशी अपेक्षा तो करतो.
यहोवाकडून नेमणूक मिळाल्यावर योनाने कोणती चूक केली?
योनाने काय प्रार्थना केली आणि यहोवाने त्याचं उत्तर कसं दिलं?
योना आपल्या चुकीतून शिकला, हे त्याने कसं दाखवलं?