ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातली आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—पुनर्भेट घेणं
हे का महत्त्वाचं आहे: राज्याच्या संदेशात आवड दाखवणारे बरेच लोक, देवाबद्दलचं सत्य शोधत असतात. (यश ५५:६) म्हणून त्यांना शिकवण्यासाठी त्यांच्याकडे सतत जात राहणं गरजेचं आहे. यामुळे त्यांना प्रगती करायला मदत होईल. लोकांच्या समस्या खूप वेगवेगळ्या असतात, त्यामुळे त्यांच्यात आवड निर्माण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतील. पण असं असलं तरी, आपण जर चांगली तयारी केली आणि प्रत्येक भेटीसाठी मनात एक ध्येय ठेवलं तर आपण जास्त प्रभावशाली ठरू. आणि असं केल्यामुळे बायबल अभ्यास सुरू करण्याचं आपलं मुख्य ध्येय आपण गाठू शकू.
हे कसं करावं:
लवकरात लवकर म्हणजे काही दिवसांतच परत जाण्याचा प्रयत्न करा.—मत्त १३:१९
मैत्रीपूर्वक असा आणि घरमालकाला आदर द्या. घाईगडबडीत संवाद साधू नका
नमस्ते बोलून, प्रेमळपणे त्यांची विचारपूस करून सुरुवात करा. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या नावाचा वापर करा. तुम्ही त्यांना भेटायला का आलात त्याबद्दल त्यांना सांगा. जसं की, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, नवीन आलेलं नियतकालिक देण्यासाठी, आपली वेबसाईट दाखवण्यासाठी, व्हिडिओ दाखवण्यासाठी किंवा बायबल अभ्यास कसा चालवला जातो ते दाखवण्यासाठी. पण जर घरमालकाने दुसऱ्या एखाद्या विषयाबद्दल आवड दाखवली, तर त्यानुसार विषयात फेरबदल करा.—फिलि २:४
शास्त्रवचनांवर आधारित एखादा मुद्दा सांगा आणि निघण्यापूर्वी एखादं साहित्य द्या. असं केल्यामुळे त्यांच्या हृदयात सत्याचं जे बी पेरलं गेलं आहे, त्याला तुम्ही पाणी घालत असाल. (१कर ३:६) यासोबतच, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करा
पुढच्या भेटीसाठी पाया घाला