देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | होशेय १–७
एकनिष्ठ प्रेम दाखवल्यामुळे यहोवाला आनंद होतो—तुम्हालाही होतो का?
एकनिष्ठ प्रेम हे असं प्रेम आहे ज्यात वचन निभावणं, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि जडून राहणं सामील आहे. एकनिष्ठ प्रेम आणि क्षमाशीलता या गुणांबद्दल शिकवण्यासाठी यहोवाने होशेय आणि त्याची अविश्वासू पत्नी गोमर यांच्या उदाहरणाचा वापर केला.—होशे १:२; २:७; ३:१-५.
एकनिष्ठ प्रेम दाखवण्यात गोमर कशी कमी पडली?
एकनिष्ठ प्रेम दाखवण्यात इस्राएलचे लोक कसे कमी पडले?
होशेयने एकनिष्ठ प्रेम कसं दाखवलं?
यहोवाने एकनिष्ठ प्रेम कसं दाखवलं?
मनन करण्यासाठी प्रश्न: मी यहोवासाठी एकनिष्ठ प्रेम कसं दाखवू शकतो?