ख्रिस्ती जीवन
देवाला आवडणारे गुण विकसित करा—विश्वास
या गुणाचं महत्त्व:
देवाचं मन आनंदित करण्यासाठी विश्वास असणं गरजेचं आहे.—इब्री ११:६
देवाच्या अभिवचनांवर विश्वास असल्यामुळे आपल्याला परीक्षांमध्ये टिकून राहायला मदत होते.—१पेत्र १:६, ७
विश्वास नसल्यामुळे आपल्या हातून पाप होऊ शकतं.—इब्री ३:१२, १३
हा गुण कसा विकसित कराल:
देवाच्या वचनाचं वाचन करा आणि त्यावर मनन करा.—रोम १०:१७; १ती ४:१५
विश्वासू सेवकांसोबत नियमित सहवास राखा. —रोम १:११, १२
माझा आणि माझ्या कुटुंबाचा विश्वास मजबूत करण्यासाठी मी काय करू शकतो?
एकनिष्ठता ज्यांमुळे मजबूत होते, असे गुण विकसित करा—विश्वास, हा व्हिडिओ पाहा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या:
निष्कपट विश्वास म्हणजे काय? (१ती १:५)
विश्वास मजबूत करण्यासाठी आपण कोणकोणत्या नकारात्मक गोष्टी टाळल्या पाहिजेत?
मोठ्या संकटादरम्यान विश्वास असणं का गरजेचं असेल? (इब्री १०:३९)