देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल ३५-३८
मागोग देशातल्या गोगचा लवकरच नाश करण्यात येईल
मागोग देशातल्या गोगचा नाश होण्याआधी आणि नाश झाल्यानंतर कोणकोणत्या घटना घडतील याविषयी बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे.
कोणाच्या नाशाने मोठ्या संकटाची सुरुवात होईल?
यहोवाच्या लोकांवर कोण हल्ला करेल?
यहोवा कोणत्या युद्धात मागोग देशातल्या गोगचा नाश करेल?
ख्रिस्त किती वर्षांसाठी राज्य करेल?
मागोगचा गोग याचा हल्ला होईल तेव्हा विश्वासात टिकून राहण्यासाठी मी आध्यात्मिक रीत्या तयार कसं राहू शकतो?