देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल ३२-३४
पहारेकऱ्यावर असलेली मोठी जबाबदारी
प्राचीन काळात शहराच्या भिंतींवर आणि बुरूजांवर पहारेकरी उभे असायचे. शत्रू येत असल्यास ते लोकांना लगेच सावध करायचे. यहोवाने लाक्षणिक अर्थाने यहेज्केलला “इस्राएल घराण्याचा पहारेकरी” म्हणून निवडलं.
यहेज्केलने लोकांना ताकीद दिली, की जर त्यांनी आपली वाईट कार्ये सोडली नाहीत तर त्यांचा नाश होईल
यहोवाकडून मिळालेला कोणता संदेश आज आपण लोकांना सांगत आहोत?
येणाऱ्या नाशाबद्दल इशारा देऊन यहेज्केल स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवू शकला
तातडीने संदेश सांगण्याची जबाबदारी यहोवाने आपल्यावर सोपवली आहे, ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे उत्तेजन मिळतं?