ख्रिस्ती जीवन
देवाला आवडणारे गुण विकसित करा—धैर्य
या गुणाचं महत्त्व:
प्रचारकार्य करण्यासाठी धैर्याची गरज असते. —प्रेका ५:२७-२९, ४१, ४२
मोठ्या संकटादरम्यान आपल्या धैर्याची परीक्षा होईल.—मत्त २४:१५-२१
मनुष्याची भीती बाळगल्याने वाईट परिणाम होतात.—यिर्म ३८:१७-२०; ३९:४-७
हा गुण कसा विकसित कराल:
यहोवाने कशा प्रकारे आपल्या लोकांचं तारण केलं यावर मनन करा.—निर्ग १४:१३
धैर्य आणि निर्भयता मिळवण्यासाठी प्रार्थना करा. —प्रेका ४:२९, ३१
यहोवावर विश्वास ठेवा.—स्तो ११८:६
सेवाकार्याप्रती वाटणाऱ्या कोणकोणत्या भीतीवर मला मात करण्याची गरज आहे?
यहोवासोबतच्या आपल्या एकनिष्ठ नात्याला तडा जाईल अशा गोष्टी टाळा—मनुष्यांची भीती, हा व्हिडिओ पाहा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या:
सेवाकार्य करण्यासाठी धैर्याची गरज का आहे?
नीतिसूत्रे २९:२५ या वचनात आपल्याला कोणत्या दोन विरुद्ध अर्थाच्या गोष्टी वाचायला मिळतात?
देवाच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी आपण आजच धैर्य विकसित करणं का गरजेचं आहे?