देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ५१-५२
यहोवाच्या वचनातील प्रत्येक गोष्ट तंतोतंत पूर्ण होते
यहोवाने भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी अचूकपणे सांगितलं
धनुष्य वापरणारा एक शाही पारसी सैनिक
बाणांना धार लावा
मेदी आणि पारसी हे धनुष्यबाण वापरण्यात कुशल होते आणि धनुष्य हे त्यांचं मुख्य शस्त्र होतं. ते त्यांच्या बाणांना धार लावायचे. त्यामुळे ते बाण शरीरात खोलवर रुतायचे
बाबेलच्या सैनिकांनी लढाई थांबवली आहे
एका पुरातन दगडी पाटीवर असं कोरण्यात आलं होतं: “कोरेशची सेना लढाई न करताच बाबेल शहरात शिरली.” ही गोष्ट दाखवते की यिर्मयाची भविष्यवाणी खरी ठरली
दगडी पाटी (नबोनायडस क्रॉनीकल)
बाबेल नासाडीचा ढिगार आणि कायमचं ओसाड होईल
बाबेलचं ऐश्वर्य इ.स.पू. ५३९ पासून कमी होऊ लागलं. थोर सिकंदर राजाने बाबेलला आपली राजधानी बनवण्याचं ठरवलं होतं. पण अचानक त्याचा मृत्यू झाला. पहिल्या शतकात काही यहूदी लोक बाबेलमध्ये राहत होते. त्यामुळे प्रेषित पेत्र बाबेलला गेला होता. पण चौथ्या शतकापर्यंत ते शहर धुळीस मिळालं आणि काही काळाने त्या शहराचं अस्तित्व पूर्णपणे नाहीसं झालं