ख्रिस्ती जीवन
यहोवाच्या अभिवचनांवर तुमचा विश्वास किती मजबूत आहे?
यहोवाने दिलेलं प्रत्येक अभिवचन पूर्ण झालं, असं यहोशवा आणि शलमोन यांनी म्हटलं. (यहो २३:१४; १रा ८:५६) या दोन्ही विश्वासू जणांनी जी साक्ष दिली त्यामुळे आपला विश्वास वाढण्यास मदत होते.—२कर १३:१; तीत १:२.
यहोशवाच्या काळात यहोवाने आपली अभिवचनं कशी पूर्ण केली? यहोवाचा एकही शब्द व्यर्थ गेला नाही हे व्हिडिओ नाटक, तुमच्या कुटुंबासोबत पाहा. त्यानंतर पुढील प्रश्नांवर चर्चा करा: (१) आपण राहाबच्या विश्वासाचं अनुकरण कसं करू शकतो? (इब्री ११:३१; याक २:२४-२६) (२) जाणूनबुजून आज्ञा मोडल्यामुळे संकटाचा सामना करावा लागतो, हे आखानच्या उदाहरणावरून आपल्याला कसं कळतं? (३) गिबोनी लोक योद्धे असूनही त्यांनी यहोशवाला फसवून इस्राएली लोकांसोबत शांतीपूर्ण संबंध का जोडले? (४) पाच अमोरी राजांनी जेव्हा इस्राएली लोकांना धमकावलं तेव्हा यहोवाचं वचन पूर्ण कसं झालं? (यहो १०:५-१४) (५) तुम्ही देवाच्या राज्याला आणि त्याच्या नीतिमत्त्वाला जीवनात पहिलं स्थान दिल्यामुळे यहोवाने तुमच्यासाठी काय केलं आहे?—मत्त ६:३३.
यहोवाने आतापर्यंत जे केलं आहे, तो आता जे करत आहे आणि भविष्यात जे करणार आहे, यांवर विचार केल्याने त्याच्या अभिवचनांवरचा आपला विश्वास आणखीन मजबूत होतो.—रोम ८:३१, ३२.
तुमचाही विश्वास यहोशवासारखा आहे का?